29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरराजकारणबंगालमध्ये खोट्या मतांसाठी पोलिसांचीच फिल्डींग?

बंगालमध्ये खोट्या मतांसाठी पोलिसांचीच फिल्डींग?

Google News Follow

Related

बंगालमध्ये भाजपाच्या काही नेत्यांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांना पत्र लिहीले आहे. या पत्रात काही पोलिसांकडूनच आधार कार्ड आणि व्होटर कार्डच्या प्रति गोळा करण्याची मोहिम राबवली जात आहे. या प्रतिंचा वापर त्या व्यक्तीच्या पोस्टल बॅलट गोळा करण्यासाठी आणि त्यानंतर नकली मते देण्यासाठी केला जाणार असल्याचा धक्कादायक उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

अबू-अस्लम भाई भाई, मुस्लिम आरक्षणासाठी आले एकत्र

या पत्रात असे म्हटले आहे की, एका कल्याणकारी संघटनेच्या नावाखाली पोलिस दलांतर्गत सर्व स्तरांवरील पोलिस कर्मचाऱ्यांचे आधार आणि व्होटर कार्डच्या प्रति गोळा करण्याचे काम केले जात आहे. हे करण्यामागचे एकमेव कारण म्हणजे, पोस्ट बॅलट गोळा करणे हे आहे. यानंतर या लोकांच्या वतीने नकली मत पाठवण्यात येणार आहे. हे अतिशय गंभीर असून हा एखाद्याच्या मूलभूत अधिकारांवरील हल्ला आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अधिक्षक श्री. शंतनु सिन्हा बिस्वास हे आयडी कार्ड गोळा करण्याच्या षड्यंत्रामागे आहेत. या बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्यामध्ये एसआय तपन कुमार मैती आणि एसआय बिजीत्साओ राऊत त्यांना सहकार्य करत आहेत. असे नमूद करण्यात आले आहे.

या पत्रात १३ फेब्रुवारी रोजी उत्तीर्णा येथे झालेल्या एका सभेत कार्यरत असणाऱ्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी तृणमुल काँग्रेसच्या राज्य अध्यक्षांच्या आणि संसद सदस्य श्री सुब्रता बक्षी यांच्या उपस्थितीत टीएमसी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली असा दावा देखील या पत्रात करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीने या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याबरोबरच अशा प्रकारचे भ्रष्ट वर्तन तात्काळ थांबावे यासाठी पावले उचलावीत अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे. या पत्रावर राज्यसभा सदस्य स्वपन दासगुप्ता, आमदार सब्यसाटी दत्त आणि शिशिर बजोरिआ यांची स्वाक्षरी आहे.

पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चपासून आठ टप्प्यातील निवडणुकांना सुरूवात होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे. त्यामुळे टीएमसी, काँग्रेस-डावी आघाडी आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा