26 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरराजकारण...तर खांडेकर संपादक पदाचा राजीनामा देणार का?

…तर खांडेकर संपादक पदाचा राजीनामा देणार का?

Google News Follow

Related

महाराष्ट्रात सध्या लसीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष रंगलेला आहे. गुरुवारी यात पत्रकारांची एन्ट्री झालेली दिसली. एबीपी माझा वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी ठाकरे सरकारच्या बाजूने केंद्र सरकारला लक्ष्य करायचा प्रयत्न केला. पण त्यांच्या आरोपांची भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी पूरी हवाच काढून टाकली.

महाराष्ट्रात एकीकडे कोरोना परिस्थीती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेलेली असताना केंद्र सरकारकडे बोट दाखवत हात झटकायचा प्रयत्न ठाकरे सरकार करताना दिसत आहे. बुधवारपासून महाराष्ट्रात लसीकरणावरून राजकारण रंगलेले दिसून आले. गुरुवारी यात भर पडली. एबीपी माझा वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर आरोप केले.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाकडूनही अनिल देशमुखांना चपराक

मुस्लिम तुष्टीकरणामुळे ममतांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोविड लसीचा दुसरा डोस

लसींचं राजकारण बंद करा

काय म्हणाले खांडेकर?
लसीकरणाच्या विषयात ट्विट करताना राजीव खांडेकर म्हणाले, “महाराष्ट्रात देशातील तब्बल ५६ टक्के कोरोनाबाधित आहेत आणि उत्तर प्रदेशात अवघे ३ टक्के! पण महाराष्ट्राला ७ लाख ४० हजार डोस दिले जाणार आणि उत्तर प्रदेशला ४४ लाख” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर पक्षपाताचा आरोप केला आहे.

भातखळकरांचा पलटवार
खांडेकरांच्या याच ट्विटला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सडेतोड जवाब दिला आहे. खांडेकरांच्या ट्विटचा समाचार घेताना “तुम्ही लसीच्या पुरवठ्याबाबत दिलेली माहिती खोटी ठरली तर तुम्ही राजीनामा देणार का?” असा सवाल भातखळकरांनी केला आहे. या सोबतच उत्तर प्रदेशचे रुग्ण महाराष्ट्रापेक्षा कमी कसे? रेमडेसीवीरचा काळाबाजार कोणाच्या आशिर्वदाने सुरु आहे? राज्याला ऑक्सिजन बाहेरून आणायची वेळ का आली? असे प्रश्न तुम्हाला पडत नाहीत का? असे विचारत भातखळकर यांनी राजीव खांडेकरांना धारेवर धरले.

बुधवारपासून महाराष्ट्रात लसीकरणाच्या मुद्द्यावरून राजकारण रंगले आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणासाठी केंद्राकडे बोट दाखवल्या नंतर केंद्र सरकारने त्यांच्या दाव्यातील असत्यता लोकांसमोर आणली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी एका पत्राद्वारे ठाकरे सरकारच्या खोट्या दाव्यांची पोलखोल केली तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारला उघडे पाडले.

काय म्हणाले जावडेकर?
“महाराष्ट्र सरकारने लसींवरून राजकारण करू नये. महाराष्ट्राला आत्तापर्यंत १,०६,१९,१९० इतक्या लसींचा पुरवठा झाला आहे. यापैकी ९०,५३,५२३ इतक्या लसी वापरल्या गेल्या आहेत. (पैकी ६% म्हणजेच तब्बल ५ लाखांपेक्षा जास्त लसी या वाया गेल्या आहेत) तर ७,४३,२८० लसी या येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला उपलब्ध लसींचा साठा हा २३ लाखांच्या आसपास आहे”. अशी आकडेवारी मांडत जावडेकरांनी ठाकरे सरकारच्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा