29 C
Mumbai
Tuesday, March 17, 2026
घरराजकारणफडणवीसच तुमचा बाजार उठवतील!

फडणवीसच तुमचा बाजार उठवतील!

Google News Follow

Related

आमदार अतुल भातखळकर यांनी केला घणाघात

भाजपाचे नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत मंगळवारी महाविकास आघाडीचे वस्त्रहरण केल्यानंतर त्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात होते आहे. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे व्हीडिओ आणि त्यातील संभाषण सादर करून फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर प्रहार केला आहे.

आमदार भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देवेंद्र आहेत ते तळपती तलवार आहेत. भ्रष्टाचाऱ्यांनो तुमचा लवकरच बाजार उठवणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे व्हीडिओ अध्यक्षांकडे सादर केले आणि त्यातील संभाषणाचे काही भाग वाचून दाखविले. त्यावरून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्यांविरोधात कटकारस्थान या व्हीडिओच्या माध्यमातून फडणवीस यांनी उघड केले.

यावेळी फडणवीस यांनी एक पेनड्राईव्ह अध्यक्षांना सूपूर्द केला. या पेनड्राईव्ह मध्ये सरकार कशी कटकारस्थाने रचताय याचे व्हीडीओ पुरावे आहेत असे फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात कसा कट रचून त्यांना अडकवण्यात आले याची पूर्ण कथाच त्यांनी मांडली. काही दिवसांपूर्वी महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

हे ही वाचा:

महिला दिनाच्या दिवशीच महिला बचत गटाचे हॉटेल पेटवले!

नवाब हटाओ! भाजपाचा आज मुंबईत विराट मोर्चा

भारताच्या ‘या’ कामगिरीसाठी पाक विद्यार्थीनीने मानले आभार

हजारो पात्र खातेदारांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नाही

 

प्रवीण चव्हाण हा इसम या सगळ्या मागचा मास्टरमाईंड असल्याचा दावा फडणवीसांनी केला.  चव्हाण हे महाराष्ट्र सरकारचे विशेष सरकारी वकील होते. विशेष सरकारी वकिलांचे कार्यालय म्हणजे राजकीय विरोधकांच्या विरोधात षडयंत्र तयार करण्याचा अड्डा झाला आहे, असा घणाघात फडणवीस यांनी केला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा