27 C
Mumbai
Friday, September 30, 2022
घरराजकारण.... पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!

…. पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!

मोहित कंबोज यांनी रोहित पवारांना लक्ष्य करत आज सकाळी ट्विट केले आहेत.

Related

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते मोहित कंबोज राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहे. महाविकास आघाडी नेत्यांवर मोहित कंबोज खोचक टीका करत असतात. आज, २८ ऑगस्ट रोजी मोहित कंबोज यांनी त्यांचा टीकेचा मोर्चा राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्याकडे वळवला आहे. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांनी रोहित पवार यांचे नाव घेतले असून राष्ट्रवादीच्या इतर दोन अटकेत असलेल्या नेत्यांवरूनदेखील खोचक टोला लगावला आहे.

मोहित कंबोज यांनी रोहित पवारांना लक्ष्य करत आज सकाळी ट्विट केली आहेत. सगळी चूक भाजपाची आहे, असे मिश्किलपणे म्हणत कंबोज यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, २००६ मध्ये भाजपानेच रोहीत पवार यांना पीएमसी बँक आणि एचडीआयएल घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांचे पार्टनर बनायला भाग पाडले. त्यामुळे या घोटाळ्यांमध्ये भाजपाचीच चूक आहे, अशी खोचक टीका त्यांनी पवारांवर केली आहे.

घोटाळे समोर आल्यानंतर भाजपाला दोष दिला जात आहे. त्यावरून मोहित कंबोज यांनी रोहित पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, स्वत: सगळे घोटाळे करून आता ते समोर आल्यावर भाजपाला दोष देण्याचा हा एक नवीन धंदा आहे. जर तुम्ही काही चुकीचे केलंच नाहीये, तर मग घाबरण्याचे काय कारण? खरा माणूस कधीच कोणत्या चौकशीला घाबरत नाही. ज्याच्या मनात चोर आहे, तोच घाबरतो. ज्यांची घरं काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरांवर दगड मारत नाही, असे सडेतोड उत्तर मोहित कंबोज यांनी दिले आहे.

तर तिसऱ्या ट्विटमध्ये कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बोलबच्चन आहेत, असा टोला कंबोज यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक बोलबच्चन होते..मियाँ नवाब मलिक (सलीम) आणि शिवसेनेत संजय राऊत (जावेद)! आता वाटतंय की या दोघांच्या जागांसाठी त्यांच्या पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. चालू द्या, पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका, असं ट्विटसुद्धा मोहित कंबोज यांनी केले आहे.

नुकत्याच केलेल्या चौथ्या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी रोहित पवारांना भारतचे जेफ बेझोस असं म्हणत निशाणा साधला आहे. भारताच्या जेफ बेझोसला भेटा. ज्याने २००६ मध्ये २१ व्या वर्षी ग्रीन एकर्स रिसॉर्ट्स अंतर्गत दोनशे विविध प्रकारच्या प्लास्टिक, हिरे, सोने, बिल्डर, निर्यात, आयात, मद्य ते ट्रंकचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे गिनीज बुकला विनंती केलीकी, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचे नाव नोंदवा! असे म्हणत रोहित पवार यांच्यावर मोहित कंबोज निशाणा साधत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
41,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा