30 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरराजकारणनवाब मलिकांनी गालावर माशी बसवावी, कोण जोरात मारतं याची स्पर्धा घ्यावी

नवाब मलिकांनी गालावर माशी बसवावी, कोण जोरात मारतं याची स्पर्धा घ्यावी

Google News Follow

Related

आपल्या अक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ह्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘नवाब मलिकांनी गालावर माशी बसवावी, कोण जोरात मारतं याची स्पर्धा घ्यावी’ असा जोरदार प्रहार राणेंनी केला आहे.

देशात कोरोनाचा उद्रेक सुरु असून महाराष्ट्राला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. पण अशा परिस्थितीतही महाराष्ट्रात राजकीय आखाडा पाहायला मिळतत आहे. १५ मे च्या शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहीत महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवर निशाणा साधला आणि राज्याच्या राजकारणात त्याचीच चर्चा सुरु झाली. फडणवीसांनी सोनिया गांधींना लिहिलेले पत्र राज्यातील नेत्यांना चांगलेच झोंबले. यानंतर महाविकास आघडीच्या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले.

हे ही वाचा:

निवडणूक सरली, आश्वासनं विरली

सकारात्मक: देशातील कोरोना चाचण्या वाढल्या, रुग्णसंख्या घटली

पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

नक्की कोण खरं? सरकारी वकील की काँग्रेस?…भाजपाचा सवाल

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांना माश्या मारण्याशिवाय दुसरे काम नाही, त्याचा त्यांनी आनंद घ्यावा असे म्हटले होते. यावरूनच नितेश राणे यांनी आक्रमक होऊन नवाब मलिकांवर तोफ डागली आहे. राज्याचा एका माजी मुख्यमंत्र्यांबद्दल कसे बोलावे हे कदाचित नवाब मलिकना अजून कळलेच नाही असे राणे म्हणाले आहेत. तर नवाब मलिकांनी माशी आपल्या गालावर बसवून भाजपा कार्यकर्त्यांकडून कोण त्या माशी ला जोरात मारतात याची एक स्पर्धा त्वरीत घ्यावी..”आनंद घेणं” कशाला म्हणतात नक्की कळेल असे नितेश राणेंनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा