27 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरराजकारणउत्तरप्रदेशात सगळे महापौर भाजपाचे तर ९९ नगराध्यक्ष

उत्तरप्रदेशात सगळे महापौर भाजपाचे तर ९९ नगराध्यक्ष

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील १७ महापालिकांमधील महापौर पदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर नगरपालिकांच्या निवडणुकीत १९९ पैकी ९९ नगराध्यक्ष पदे देखील पटकावली आहेत. तर समाजवादी पक्षाचे ३७, बहुजन समाज पक्षाचे २० नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. दरम्यान काँग्रेसला फक्त ४ नगराध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेशात महापालिकांचे महापौर नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला. अलिगड, शहाजापूर, कानपूर, गोरखपूर, लखनऊ, मेरठ या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपने समाजवादी पक्षाचा पराभव केला आहे. तर बरेली, आग्रा, मुरादाबाद या नगरपालिकांमध्येही समाजवादी पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे.

हे ही वाचा:

स्तूपांचे शहर ‘सांची’त आता भरपूर सौर ऊर्जा

भारताची परकीय चलन गंगाजळी ५७२ अब्ज डॉलरवर

ठाकरे पुन्हा शेंडी-जानव्याला शरण! शिंगणापूरचा, शनी बळ देईल काय?

देशातील सर्वात मोठा सिम कार्ड घोटाळा उघड

भाजपने तिथली नगराध्यक्ष पदे समाजवादी पक्षाकडून खेचून घेतली आहेत. झाशी, सहारनपूर, मथुरा वृंदावन, कन्नौज, हस्तिनापूर मध्ये देखील भाजपनेच विजय मिळवला आहे. योगींचा चेहरा आणि भाजपचे संघटन याचा चांगला मिलाफ या निवडणुकीत दिसल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेय.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा