34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषस्तूपांचे शहर ‘सांची’त आता भरपूर सौर ऊर्जा

स्तूपांचे शहर ‘सांची’त आता भरपूर सौर ऊर्जा

शहरात पाच मेगा वॉट आणि तीन मेगा वॉट क्षमतेची दोन सौर स्थानके बांधली जात आहेत.

Google News Follow

Related

जगप्रसिद्ध आणि बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी महत्त्वाचे स्थान असलेले सांची शहर सौर ऊर्जेचे शहर बनणार आहे. या स्तूपाच्या आसपास वाढलेल्या नागरी वसाहती आता संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतील. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेले सांची शहर खरे तर नऊ हजार लोकसंख्येचे गाव आहे. मात्र ते पृथ्वीच्या कर्कवृत्तावर येत असल्याने सूर्याची ऊर्जा शोषून घेण्यासाठी हे अतिशय योग्य ठिकाण आहे. त्यामुळेच आता ते देशातील सौर शहरांपैकी एक शहर होत आहे. मे महिन्यात हे सांची शहर सौर शहर बनेल.

आताही छोट्याशा शहरात फेरफटका मारला, तर रस्त्याच्या कोपऱ्यात, चहा स्टॉल, नाक्यावर गप्पा मारण्यासाठी उभे राहिलेले गावकरी, सर्वजण अभिमानाने नव्याने बसवलेल्या सौर पथदिव्यांकडे पाहतात. सांची येथे आवश्यक तेवढी (किंवा जास्त) वीज सौर पॅनेलद्वारे निर्माण करून ग्रीडला पुरवण्याची कल्पना आहे. शहरात पाच मेगा वॉट आणि तीन मेगा वॉट क्षमतेची दोन सौर स्थानके बांधली जात आहेत. वारसा स्थळाच्या गदी जवळ, पाच हेक्टरवर छोटा प्रकल्प बांधला जात आहे. ‘शहराला दरवर्षी सुमारे तीन दशलक्ष युनिट उर्जेची आवश्यकता असते. तीन मेगा वॉटचा प्रकल्प शहरी गरजा पूर्ण करेल आणि पाच मेगा वॉटचा प्रकल्प शेतीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल,’ असे मध्य प्रदेश ऊर्जा विकास निगमचे अधीक्षक अभियंता श्रीकांत देशमुख यांनी सांगितले. सौर सांची प्रकल्पाची अंमलबजावणी ही संस्था करते आहे.

ऊर्जेचा वापर कमी करण्यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. “आम्ही लोकांना प्रशिक्षण देत आहोत. ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे पुरवत आहोत आणि सांचीमधील सर्व २० सरकारी इमारतींचे ऊर्जा ऑडिट करत आहोत. लेखापरीक्षण अहवालानुसार विद्युत उपकरणांमध्ये सुधारणा केल्या जातील. आम्ही या सरकारी इमारतींवरील छतांवर सौर ऊर्जा पॅनेल बसवणार आहोत,’ अशी माहिती रायसेन जिल्ह्यातील ‘नवीन आणि अक्षय्य ऊर्जा प्राधिकरणा’चे कार्यकारी अभियंता पीके शांडिल्य यांनी दिली.

‘संपूर्ण शहरात ३००हून अधिक सौर पथदिवे बसवण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या पंपिंग स्टेशनचे रूपांतर सौरऊर्जेत होणार आहे. आम्ही रस्त्यावरील विक्रेते आणि रहिवाशांना ऊर्जा-कार्यक्षम सौर कंदील आणि दिवेही वितरित करणार आहोत. हे सर्व उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून नगरपालिकेच्या माध्यमातून केले जात आहे,’ असे शांडिल्य यांनी सांगितले.

सौरऊर्जेवर जाण्याच्या प्रशासनाच्या मोहिमेचा रहिवाशांवरही परिणाम होत आहे. अनेकजण छतावर सौर ऊर्जा पॅनेल बसवत आहेत. यासाठी डिस्कॉमने पुढाकार घेतला आहे. ३० रहिवाशांनी आतापर्यंत छतावर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यासाठी नोंदणी केली आहे.

व्यक्ती चालल्यावर ऊर्जेची निर्मिती होऊ शकेल, असे कार्पेट्सही मागवले जाणार आहेत. वारसा स्थळाच्या ठिकाणी या कार्पेट्स अंथरून तिथे डिस्प्ले फलकही लावला जाणार आहे, जेणेकरून येथून चालणाऱ्या पर्यटकांना येथून चालल्यावर किती वीज निर्माण झाली, हे कळू शकेल.

 

स्थानिक रहिवासी कमल किशोर पटेल हेदेखील या अनोख्या प्रयोगाने भारावले आहेत. त्यांनी त्यांच्या घरच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल उभारला आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे त्यांचे विजेचे बिल शून्य येईल, असा विश्वास त्यांना आहे. ‘मला सांगण्यात आले आहे की, सौर पॅनेल २० वर्षे टिकतील. हे एका उदात्त कारणासाठी असून पर्यावरणास अनुकूल आहे. आपल्या जगप्रसिद्ध शहराला यामुळे एक नवा आयाम मिळेल,’ असे ते सांगतात.

हे ही वाचा:

तुरुंगात कैदी फोन वापरताना दिसला तर तुरुंग कर्मचाऱ्याला

”द केरळ स्टोरी” पोहोचला १०० कोटींच्या जवळ

चीनमध्ये एक लाखाहून अधिक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई

बंगळुरूमधील ५ स्टार हॉटेल मध्ये खोल्या बुक, काँग्रेसला स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही?

स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या मोहिमेला गावकऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले. ‘आपण जी ऊर्जा वापरतो, ती आपण निर्माण करतो – ही कल्पना खूप चांगली आहे. त्यामुळे शहराच्या नावलौकिकातही भर पडणार आहे. पथदिव्यांसाठी आमचे विजेचे बिल दरमहा सुमारे तीन लाख रुपये आहे आणि पम्पिंग स्टेशनसाठी एक ते दीड लाख रुपये येते. हे पैसे आम्ही वाचवू शकू, असे स्थानिक नगरसेवकाने सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा