24 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरराजकारणएक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

भाजपाला बहुमत तर काँग्रेस, आपची पीछेहाट

Google News Follow

Related

गुजरात आणि हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचीच सत्ता येण्याची चिन्हे आहेत. ५ डिसेंबरला एक्झिट पोलमध्ये भाजपाच या दोन्ही राज्यांत सत्ता कायम राखण्यात यश मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

गुजरातमध्ये याआधीच्या निवडणुकीत भाजपाला ९९ जागांवर समाधान मानावे लागले होते पण यावेळी १८२ जागांपैकी १३० ते १४५ जागांची खात्री दिली जात आहे. काँग्रेस या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असेल पण त्यांच्या खात्यात ४० पेक्षा कमी जागा असतील असा अंदाज असून आम आदमी पार्टीला मात्र ५ ते १५ जागा देण्यात आल्या आहेत.

८ डिसेंबरला या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. त्यावेळी प्रत्यक्ष निकाल स्पष्ट होईलच पण जवळपास सगळ्या एक्झिट पोलनी भाजपालाच झुकते माप दिले आहे.

टाइम्स नाऊ नवभारतने भाजपाला गुजरातमध्ये १३५ ते १४५ जागा आणि काँग्रेसला २४ ते ३४ जागा दिल्या आहेत. तर आम आदमी पार्टीला ६ ते १६ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

‘अनेक देशांसाठी भारत हा रोल मॉडेल’

संघाला विरोध मग पीएफआयच्या पाठीशी का?

आणखी चित्ते भारतात येण्याच्या प्रतीक्षेत

कुर्ल्यातील बलात्काराच्या घटनेबद्दल चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप

आज तक एक्सिस माय इंडियाने हिमाचल प्रदेशात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चांगली झुंज पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला असून ६८ जागांमध्ये भाजपाला २४ ते ३४ तर काँग्रेसला ३० ते ४० जागा दिल्या आहेत.

न्यूज एक्स जन की बातने गुजरातमध्ये भाजपाला १२८ ते १४८ जागा तर काँग्रेसला ३० ते ४२ आणि आम आदमीला २ ते १० जागा दिल्या आहेत. न्यूज एक्सने हिमाचलमध्ये भाजपाला ३२ ते ४० जागा तर काँग्रेसला २७ ते ३४ जागा दिल्या आहेत. आपला मात्र तिथे खातेही उघडता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

इंडिया टुडेने गुजरातमध्ये भाजपाला १२९ ते १५१जागा दिल्या आहेत.

चाणक्यने हिमाचलमध्ये त्रिशंकू विधानसभा असेल असे गणित मांडले आहे.भाजपा आणि काँग्रेसला प्रत्येकी ४२ टक्के मते मिळतील असे त्यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा