23 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरराजकारणकेसीआरला धक्का! दोन दिवसात दोन खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश!

केसीआरला धक्का! दोन दिवसात दोन खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश!

भाजप-काँग्रेसमध्ये सामील होण्यासाठी बीआरएस नेत्यांची धावपळ

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला( बीआरएस) धक्क्याचा सामना करावा लागत आहे.गेल्या दोन दिवसात बीआरएसचे दोन खासदार भाजपामध्ये दाखल झाले आहेत.झहिराबाद लोकसभा मतदार संघाचे विद्यमान बीआरएस खासदार भीमराम बसवंतराव पाटील यांनी शुक्रवारी ( १ मार्च) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.दरम्यान, एक दिवस आधी नगरकुर्नुलचे खासदार पोथुगंती रामुलू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

नवी दिल्लीतील भाजप कार्यालयात पोथुगंती रामुलू आणि त्यांचा मुलगा भरत तसेच अन्य तीन बीआरएस नेत्यांनी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा:

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार, लश्कर-ए-तोयबाचा गुप्तचर प्रमुख चीमा याचा पाकिस्तानात मृत्यू!

देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत दररोज ३,५१६ कोटींची भर

युवराज सिंग नव्हे; जया प्रदा, अक्षय कुमार, सेहवाग यांच्या उमेदवारीसाठी भाजप प्रयत्नशील!

‘या चित्रपटामुळे कोणी नाराज झाल्याचे मला तरी दिसलेले नाही’

मिळालेल्या माहितीनुसार, बीआरएसचे आणखी दोन खासदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत तर आणखी दोन खासदार राज्याच्या सत्ताधारी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहेत.गेल्या महिन्यात, पेडापल्लीचे खासदार बोर्लाकुंता व्यंकटेश आणि तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्ट बोर्डाचे माजी सदस्य मन्ने जीवन रेड्डी यांनीही बीआरएस पक्षाचा राजीनामा देत नवी दिल्लीत काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएस पक्षाचा दारुण पराभव झाला.या पराभवातून माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव अजूनही सावरले नसताना, बीआरएस खासदार भाजपमध्ये अथवा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेत आहेत.तसेच काही नेते लोकसभा निवडणुक लढण्याचे टाळत आहेत.ईटीच्या अहवालानुसार, केसीआर यांनी आपली गमावलेली जागा परत मिळवण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतात.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा