30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरविशेष२६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार, लश्कर-ए-तोयबाचा गुप्तचर प्रमुख चीमा याचा पाकिस्तानात मृत्यू!

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार, लश्कर-ए-तोयबाचा गुप्तचर प्रमुख चीमा याचा पाकिस्तानात मृत्यू!

लष्कर-ए-तोयबाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा पाकीस्तानचा दावा भारताने फेटाळला

Google News Follow

Related

लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा गुप्तचर प्रमुख आझम चीमा (७०) याचे फैसलाबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अलीकडच्या काही महिन्यांत लश्कर-ए-तोयबाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या गूढ हत्यांच्या पार्श्वभूमीवर याचाही मृत्यू संशयास्पद असल्याची अटकळ पाकिस्तानच्या जिहादी वर्तुळात बांधली जात आहे.

पाकिस्तानने अनेक लष्कर-ए-तोयबाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर संस्था असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. भारताने अशा प्रकारे हिटलिस्टवर असलेल्या दहशतवाद्यांची यादी केलेली नाही, असे स्पष्ट केले आहे. आणि जर खरेच अशी एखादी यादी असती तर चीमा हा जमात-उद दावाचा प्रमुख हाफिज सईद आणि जमातचा प्रमुख मौलाना मसूद अझहर चीमा यांच्यासोबत त्याचा क्रमांक नक्कीच असता. २६/११चा दहशतवादी हल्ला, जुलै २००६मधील मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेले बॉम्बस्फोट तसेच, भारतातील इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा तो सूत्रधार होता.

त्याच्या मृत्यूच्या बातमीमुळे पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे, असे भारतातर्फे सांगण्यात आले. दहशतवादी असल्याचा दावा भारताने वारंवार फेटाळून लावला आहे.गुप्तचर सूत्रांनी चीमाचे वर्णन पंजाबी भाषिक, दाढी असणारा आणि शस्त्रांनी सुसज्ज असा लष्कर-ए-तोयबाचा सूत्रधार असा केला आहे. सन २०००च्या दशकात तो पाकिस्तानातील बहावलपूर येथे त्याची पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. ‘तो अनेकदा सहा अंगरक्षकांसह लँड क्रूझरमधून फिरताना दिसला.

हे ही वाचा:

युवराज सिंग नव्हे; जया प्रदा, अक्षय कुमार, सेहवाग यांच्या उमेदवारीसाठी भाजप प्रयत्नशील!

‘या चित्रपटामुळे कोणी नाराज झाल्याचे मला तरी दिसलेले नाही’

नितीन गडकरी यांची मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश यंना कायदेशीर नोटीस!

भारताला भेट देण्यासाठी आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार!

चीमानेच एकेकाळी आयएसआयचे माजी प्रमुख जनरल हमीद गुल, ब्रिगेडियर रियाझ आणि कर्नल रफिक यांना बहावलपूर कॅम्पमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेत असलेल्या जेहादींचे ब्रेनवॉश करण्यासाठी आणले होते. तो अधूनमधून कराची आणि लाहोरमधील प्रशिक्षण शिबिरांना भेट देत असे,’ अशी माहिती एका सूत्राने दिली.

अफगाण युद्धातील अनुभवी असणारा चीमा हा नकाशा वाचण्यातील तज्ज्ञ म्हणून ओळखला जात होता. विशेषतः भारताचा नकाशा त्याला तोंडपाठ होता. ‘त्याने जिहादींना नकाशावर भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती दिली होती. तो २०००च्या दशकाच्या मध्यात सॅटेलाइट फोनद्वारे संपूर्ण भारतातील लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना सूचना देत असे,’ असे आणखी एका स्रोताने सांगितले.

चीमा हा सन २००८मध्ये पाकिस्तानातील बहावलपूरसाठी एलईटी कमांडर म्हणून काम करत होता. तेव्हा त्याला लष्करचे वरिष्ठ अधिकारी झकी-उर-रहमान लखवी यांचे ऑपरेशन सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्याने २६/११च्या मुंबई हल्ल्यासाठी भरती केलेल्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासह हल्ल्याचे नियोजन आणि अंमलबजावणीही केली होती. ‘यूएस डिपार्टमेंट ऑफ ट्रेझरी’ने त्याचे वर्णन एलईटीच्या दहशतवादी कारवायांमधील एक ‘मुख्य कमांडर’ म्हणून केले आहे. त्याचा संबंध उसामा बिन लादेनच्या अल-कायदा नेटवर्कशीही होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा