20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरराजकारणमंत्री हाकणार 'किल्ल्यांवरून' कारभार

मंत्री हाकणार ‘किल्ल्यांवरून’ कारभार

Related

राज्यातील दुकानांच्या नावाच्या पाट्या या मराठीत हव्या असा निर्णय नुकताच मंत्रिमंडळात घेण्यात आला. त्यापाठोपाठ आता मंत्र्यांच्या बंगल्याची नावे बदलण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता मंत्र्यांच्या बंगल्यांना गड किल्ल्यांची नावे देण्यात येणार आहेत.

राज्याच्या सार्वजनिक आणि बांधकाम विभागाने काढलेल्या एका परिपत्रकानुसार आता मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या नावांना गड किल्ल्यांची नावे देण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या २० कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांना आता गडकिल्ल्यांचे नाव देणारा आदेश जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

…आणि तिने बसचे स्टेअरिंग हाती घेत वाचवले प्रवाशांचे प्राण! नेमके घडले काय?

अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक

नागपूरच्या २० वर्षीय मालविकाने सायनाला केले पराभूत

बिकानेर एक्स्प्रेसचे चार डबे घसरले; तीन जण दगावले

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला गड किल्ल्यांची नावे देण्याची मागणी केली होती. ही मागणी राज्य सरकारपुढे विचाराधीन होती. त्यानुसार सार्वजनिक आणि बांधकाम विभागाने मंत्र्यांच्या आणि राज्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे पत्रकही जारी करण्यात आले आहे. उदय सामंत यांनी ट्विट करत या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे.

कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला कोणत्या किल्ल्याचे नाव?

 • अ 3 – शिवगड – जितेंद्र आव्हाड
 • अ 4 – राजगड – दादा भुसे
 • अ 5 – प्रतापगड -के.सी. पाडवी
 • अ 6 – रायगड – आदित्य ठाकरे
 • अ 9 – लोहगड –
 • बी 1 – सिंहगड – विजय वड्डेटीवार
 • बी 2 – रत्नसिंधू – उदय सामंत
 • बी 3 – जंजिरा – अमित देशमुख
 • बी 4 – पावनगड – वर्षा गायकवाड
 • बी 5 – विजयदुर्ग – हसन मुश्रीफ
 • बी 6 – सिद्धगड – यशोमती ठाकूर
 • बी 7 – पन्हाळगड – सुनील केदार
 • क 1 – सुवर्णगड – गुलाबराव पाटील
 • क 2 – ब्रह्मगिरी – संदीपान भुमरे
 • क 3 – पुरंदर
 • क 4 – शिवालय
 • क 5 – अजिंक्यतारा – अनिल परब
 • क 6 – प्रचितगड – बाळासाहेब पाटील
 • क 7 – जयगड
 • क 8 – विशाळगड
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा