34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणअभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक

अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक

Google News Follow

Related

राजकीय भूमिका घेतल्याने एका मराठी अभिनेत्याला मालिकेतील काम गमवावे लागल्याची चर्चा आहे. अभिनेते किरण माने यांना ‘स्टार प्रवाह’ या चॅनेलवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. किरण माने हे सोशल मीडियावर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडत असतात.

सोशल मीडियावर किरण माने यांनी एक पोस्ट केली होती. ‘आम्ही दोन प्रेक्षक असले तरी प्रयोग करतो..’ अशी ती पोस्ट होती. यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले. कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नसल्याचे किरण माने यांनी सांगितले. मात्र, लोकांनी तसा समज करून घेतला आणि स्टार प्रवाहच्या पेजवर कॅम्पेन चालवले की, यांना सिरियलमधून काढून टाकण्यात यावे. त्यानंतर अचानक त्यांना मालिकेतून काढण्यात आल्याचे माने यांनी सांगितले.

यावर किरण माने म्हणाले की, महाराष्ट्रात अशी झुंडशाही खपवून घेतली जाऊ नये. माझ्या उदाहरणामधून काय घडणार आहे, हे आपण पाहूयात. यात जर मला न्याय मिळाला नाही तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही, असेही ते म्हणाले. माझ्या इतर पोस्ट वाचा, त्यामध्ये कुठेही जातीवादी किंवा उगाच केलेली टीका दिसणार नाही. मला असं वाटत होतं की, महाराष्ट्रात असं होणार नाही. पण माझ्याबाबतीत असं झाले आहे आणि मी बळी पडलो. पण ठिक आहे मी यातून उभा राहिन. मी खंबीर आहे. हा माझा अभिनय क्षेत्रातला झालेला खून आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

नागपूरच्या २० वर्षीय मालविकाने सायनाला केले पराभूत

बिकानेर एक्स्प्रेसचे चार डबे घसरले; तीन जण दगावले

दाऊदचा भाचा सोहेल कासकर पाकिस्तानमध्ये निसटला

कोरोना संसर्ग झालेल्या दोन कोटी लोकांना पेटीत केले बंद

दरम्यान, किरण माने यांना पाठींबा देण्यासाठी आता या वादात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी किरण माने यांना मालिकेमधून काढले गेले म्हणून निषेध व्यक्त केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा