सीबीआयने मंगळवारी कथित नीट युजी २०२६ (NEET-UG 2026) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिक येथून ३० वर्षीय बीएएमएस विद्यार्थ्याला ताब्यात घेतले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. १० लाखाला ही प्रश्नपत्रिका विकत घेऊन ती १५ लाखाला विकल्याचा या विद्यार्थ्यांवर आरोप आहे.
आरोपीची ओळख शुभम खैरनार अशी आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने पुण्यातील एका संशयिताकडून २०२६ च्या नीट-यूजी प्रश्नपत्रिका “फुटी” प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेले ‘अपेक्षित प्रश्नसंच’ १० लाख रुपयांना विकत घेतले आणि पुढे ते हरियाणातील एका खरेदीदाराला १५ लाख रुपयांना विकले.
केंद्र सरकारने कथित प्रश्नपत्रिका फुटीची चौकशी करण्याची जबाबदारी दिलेल्या सीबीआयच्या तब्बल चार पथकांनी शुबम खैरनारला ताब्यात घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. त्याला सुरुवातीला नाशिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला केंद्रीय तपास संस्थेकडे सोपवण्यात आले.
हे ही वाचा:
सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहाजणांचा मृत्यू
आम्हाला आमच्या कामगिरीचा अभिमान आहे
उदयनिधी स्टालिन यांना पुन्हा सनातनविरोधाचा झटका
पाकिस्तानच्या नोमान अलीने रचला इतिहास
पोलिस सूत्रांनी असेही सांगितले की परीक्षेची प्रश्नपत्रिका नाशिकमध्ये छापली गेली नव्हती. या दाव्यामुळे प्रश्नपत्रिका शहरातील छपाई केंद्रातून थेट फुटल्याच्या आधीच्या सिद्धांतावर संशय निर्माण झाला आहे.
दरम्यान, शुबमचे वडील डॉ. मधुकर खैरनार यांनी आपल्या मुलावरील आरोप फेटाळून लावत तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एनटीएने ३ मे रोजी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) आयोजित केली होती. सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा दिली होती.
एक आठवड्याहून अधिक कालावधीनंतर, मंगळवारी १२ मे रोजी, प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणावरून वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर आणि राजस्थान पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईनंतर एनटीएने परीक्षा रद्द केली.
“राजस्थान स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने नीट (यूजी) २०२६ संदर्भातील कथित अनियमिततांबाबत सुरू केलेल्या कारवाईच्या वृत्तांची नॅशनल टेस्टिंग एजन्सीला माहिती आहे. ३ मे २०२६ रोजीची परीक्षा नियोजित वेळेनुसार आणि संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत पार पडली,” असे एनटीएने १० मे रोजी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले होते.
परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या मते, कथित गैरप्रकारांबाबतची माहिती ७ मेच्या संध्याकाळी, म्हणजे परीक्षेनंतर चार दिवसांनी मिळाली होती. त्यानंतर ८ मेच्या सकाळी “स्वतंत्र पडताळणी आणि आवश्यक कारवाई” साठी ही माहिती केंद्रीय संस्थांकडे पाठवण्यात आली.
एनटीएने पुढे म्हटले की अलीकडील अटकांसह कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी केलेली कारवाई ही तपास संस्थांच्या “व्यावसायिक आणि वेळेवर केलेल्या कामाचा” परिणाम आहे.
१२ मे रोजी एनटीएने २०२६ ची नीट-यूजी परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. त्याआधी राजस्थानमध्ये राज्य पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) ने ३ मेच्या परीक्षेच्या काही दिवस आधी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांची चौकशी सुरू केली होती.
राजस्थान एसओजीच्या तपासानुसार, ज्याचे तपशील गेल्या दोन दिवसांत समोर आले, हस्तलिखित प्रश्नांचा एक संच कथित “गेस पेपर” चा भाग होता आणि त्यातील काही प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिकेशी जुळत होते.







