27 C
Mumbai
Friday, August 19, 2022
घरक्राईमनामादाऊदचा भाचा सोहेल कासकर पाकिस्तानमध्ये निसटला

दाऊदचा भाचा सोहेल कासकर पाकिस्तानमध्ये निसटला

Related

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा भाचा सोहेल कासकरला भारतात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. सोहेल हा दुबईमार्गे पाकिस्तानला फरार झाल्याचे वृत्त आहे. नार्को टेररिझमच्या आरोपाखाली अमेरिकन एजन्सींनी त्याला अटक केली होती. मात्र, सोहेल आता निसटून पाकिस्तानात परतला असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. याला अमेरिकन तपास यंत्रणांनीही दुजोरा दिला आहे.

सोहेल कासकर हा भारतात ‘वॉन्टेड’ होता. अंमली पदार्थ दहशतवाद प्रकरणात अमेरिकेच्या यंत्रणांनी सोहेल याला अटक केली होती. यानंतर त्याला भारताच्या कस्टडीमध्ये मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांचे सतत प्रयत्न सुरू होते. या दरम्यान, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी कासकरचा एक कॉल इंटरसेप्ट केला होता. यामध्ये तो पाकिस्तानला पळून गेल्याचे समोर आले. सोहेल हा दाऊदचा भाऊ नूरा कासकरचा मुलगा आहे.

हे ही वाचा:

कोरोना संसर्ग झालेल्या दोन कोटी लोकांना पेटीत केले बंद

छगन भुजबळ अडचणीत; क्लीन चीटला उच्च न्यायालयात आव्हान  

ठाकरे सरकारची प्रताप सरनाईकांवर कृपादृष्टी

१८ जानेवारीला पृथ्वीजवळून जाणार भलामोठा लघुग्रह!

सोहेल याच्याकडून डी कंपनीच्या विविध कामांबद्दल माहिती मिळणे शक्य होणार होते. भारतात त्याच्याविरुद्ध कोणतेही मोठे खटले नसले तरी तो मुंबई पोलिसांच्या रडारवर होता. दाऊद इब्राहीम याच्याबद्दलही त्याच्याकडून माहिती मिळण्याची शक्यता होती. मात्र, आता सोहेल पाकिस्तानमध्ये निसटला असल्याने ही माहिती मिळणे कठीण होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,910चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा