29 C
Mumbai
Friday, August 19, 2022
घरक्राईमनामाछगन भुजबळ अडचणीत; क्लीन चीटला उच्च न्यायालयात आव्हान  

छगन भुजबळ अडचणीत; क्लीन चीटला उच्च न्यायालयात आव्हान  

Related

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आणि कुटुंबियांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाच्या या निकालाविरोधात समाजसेविका अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान दिले आहे. यामुळे आता छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळ यांची या प्रकरणी राज्य लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी करण्यात आली होती. चौकशीनंतर क्लीन चीट मिळाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता.

अर्जात, आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार असल्याने न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. याच निर्णया विरोधात अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

हे ही वाचा:

कोरोना संसर्ग झालेल्या दोन कोटी लोकांना पेटीत केले बंद

वर्ध्यात गोबर गॅस टाकीत सापडल्या कवड्या, हाडे; अवैध गर्भपाताचे रॅकेट?

ठाकरे सरकारची प्रताप सरनाईकांवर कृपादृष्टी

अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट

अंजली दमानिया यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. ‘छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला भ्रष्टाचार विरोधी कार्यालयाने आव्हान दिले नसल्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. मी मुंबई उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्तता केल्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कुटुंबाला वेगवेगळ्या कंत्राटांच्या माध्यमातून आर्थिक फायदे करुन दिले. तसेच छगन भुजबळ यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाच मिळाल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर होता. २०१५ साली भुजबळ यांच्याविरोधत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख यांचा समावेश होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,910चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
24,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा