29.1 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरराजकारणमहुआ मोइत्रा यांच्या कार्यालयावर अंडी आणि वांगी फेकली

महुआ मोइत्रा यांच्या कार्यालयावर अंडी आणि वांगी फेकली

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Google News Follow

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या कोलकात्याच्या कृष्णानगर येथील कार्यालयाबाहेर काही आंदोलकांनी अंडी आणि भाज्यांची फेक केल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेचा व्हिडिओ महुआ मोइत्रा यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केला असून, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महुआ मोइत्रा यांनी आरोप केला की, त्यांच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या काही आंदोलकांनी घोषणाबाजी करत अंडी आणि भाज्या फेकल्या. यावेळी पोलीस घटनास्थळी उपस्थित असूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा दावाही त्यांनी केला. व्हिडिओमध्ये त्या आपल्या कार्यालयातच थांबून परिस्थितीची माहिती देताना दिसत आहेत.

त्यांच्या कार्यालयाबाहेर अनेक लोक जमलेले दिसत आहेत. त्यांच्याकडून अंडी, भाज्या फेकण्यात आल्याचे मोईत्रा या आपल्याच व्हीडिओतून दाखवत आहेत. ते सगळे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा त्यांचा आरोप आहे. मागे ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना अशा अंड्यांचा मार सहन करावा लागला होता. अनेक कार्यकर्त्यांना लोकांनी अंडी फेकून मारल्याचे व्हीडिओ समोर आले आहेत. आता ही वेळ महुआ मोईत्रा यांच्यावर आली आहे. ममता बॅनर्जी पराभूत झाल्यानंतर बंगालमधील जनता ही तृणमूलवरील आपला राग, संताप दाखवू लागली असल्याचे बोलले जाते.

हे ही वाचा:
पाण्यात उतरलेल्या विजेच्या प्रवाहाने दोन कॉलेज विद्यार्थिनींना बसला शॉक

विक्रोळीच्या पुलामुळे वाढली डोकेदुखी, प्रवाशांचा, चालकांचा संताप

पॉन्झी स्कीम्सवर लक्ष ठेवणाऱ्या इंटेलिजन्स युनिट्सचे काय झाले?

विम्बल्डनमध्ये सेरेनाच्या पुनरागमनाला धक्का

या घटनेनंतर महुआ मोइत्रा यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, लोकशाहीत अशा प्रकारच्या आंदोलनाला स्थान नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, या घटनेमागे भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, महुआ मोइत्रा यांनी केलेल्या आरोपांबाबत संबंधित पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच, पोलिसांकडूनही या प्रकरणी सविस्तर निवेदन जारी करण्यात आलेले नाही. या घटनेमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा