28 C
Mumbai
Tuesday, March 31, 2026
घरराजकारणबारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक; ‘या’ दिवशी मतदान

बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक; ‘या’ दिवशी मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर

Google News Follow

Related

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. या निवडणुकीसोबतच देशातील विविध राज्यातील विधानसभांच्या आठ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहेत. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राहुरी आणि बारामतीसाठी २३ एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागाही रिकामी आहे. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जागेवर लढणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची माहिती आहे. यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा:

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वाजले बिगुल; ४ मे रोजी निकाल

तीन राज्यांमध्ये स्फोट घडवण्याचा कट उधळला; आरडीएक्स, आयईडीसह तिघांना अटक

आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या सहा जणांच्या आवळल्या मुसक्या

UAE निर्बंधांचा परिणाम; दुबई मार्गावरील अनेक उड्डाणे रद्द

दुसरीकडे राहुरी विधानसभेसाठी महाविकास आघाडी इच्छुक असल्याचे बोलले जात असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता आहे. भाजपकडून राहुरीत कोणाला संधी दिली जाते याकडे लक्ष असणार आहे. शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिलेंच्या नावाची देखील चर्चा आहे. तर राहुरीतही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा