31 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरराजकारणअस्लम शेखवर गुन्हा दाखल करा! मालवणीत संताप

अस्लम शेखवर गुन्हा दाखल करा! मालवणीत संताप

मंत्री लोढांना धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे स्थानिकांसह भाजपाचा मोर्चा

Google News Follow

Related

बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात सातत्याने आवाज उठवणारे मुंबई उपनगरचे सह पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांना मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी दिलेल्या धमकीनंतर तिथले वातावरण तापले आहे. हजारो स्थानिक नागरिकांसह रविवारी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मालवणीच्या रस्त्यावर उतरले. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना पळवा, मुंबई वाचवा, देशाच्या सुरक्षेशी खेळू देणार नाही..आंदोलनातील या घोषणांनी मालवणनीचा परिसर दणाणून गेला होता. धमकी देणारे अस्लम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, मागणीसाठी मालवणी पोलीस ठाण्यात भाजप नेत्यांनीही यावेळी ठिय्या आंदोलन केले.

मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीला खतपाणी घालत असून देशाच्या सुरक्षेशी खेळत असल्याच्या अनेक तक्रारी मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या. यावर सातत्याने प्रशासनाशी पाठपुरावा करून त्या भागात अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.

हे ही वाचा: 

SIR योजनेमुळे पश्चिम बंगालमध्ये दोन भाऊ ३७ वर्षांनी भेटले!

स्मृती मंधानाचा विवाह सोहळा स्थगित, वडिलांची तब्येत बिघडली

केएल राहुल वनडेसाठी कर्णधार, जडेजा–ऋतुराजचे पुनरागमन

उकडलेली डाळ की फोडणीची डाळ?

याचा राग मनात धरून शेख यांनी मंत्री लोढा यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला संपवण्याची जाहीररीत्या भाषा केली आहे. या धमकीच्या संदर्भात लोढा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार देखील केली आहे. आता याचे पडसाद उमटत असून स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आहे. हा लढा अधिक तीव्र होताना दिसत असून स्थानिकांनी शेख यांचे बॅनर फाडून आपला रोष व्यक्त केला. स्थानिकांसह भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले.

स्थानिकांच्या आंदोलनात भाजप नेते आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर , मनीषा चौधरी आणि संजय उपाध्याय देखील या आंदोलनात सहभागी झाले.

यावेळी संजय उपाध्याय म्हणाले की, राज्याच्या मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला एखादा आमदार जीवे मारण्याची धमकी देतो हे अतिशय गंभीर आहे. याचा आम्ही कायद्याचे पालन करून विरोध करत आहोत, पण शेख यांना समजेल अशा भाषेत देखील आम्ही उत्तर देऊ शकतो. तर बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, जे या घुसखोरांना पाठबळ देत आहेत, त्यांच्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी आम्ही मालवणी पोलीस ठाण्यात देखील ठिय्या दिला आहे. त्यानुसार पोलीस प्रशासन कारवाई करेल असेही, आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले.

हा केवळ भाजप विरुद्ध काँग्रेस असा हा संघर्ष नाही तर, देशाच्या सुरक्षेसंदर्भात जनता विरुद्ध काँग्रेस असा हा संघर्ष असल्याचे आमदार अतुल भातखळकर यावेळी म्हणाले. या आंदोलनात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांच्यासह सकल हिंदु समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा