24 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरराजकारण“त्या दुर्दैवी मृतकांना 'शरदवासी' म्हणायचे का?”

“त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी’ म्हणायचे का?”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवारांवर निशाणा

Google News Follow

Related

समृद्धी महामार्गावरील झालेल्या बसच्या अपघातानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. हा अपघात अतिशय दुर्दैवी घटना असून संपूर्ण महाराष्ट्र शोक करतो आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी खालची पातळी गाठली आहे.

समृद्धी महामार्गावरील या अपघाताबद्दल मत मांडताना शरद पवार म्हणाले, “आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला.” या प्रतिक्रियेनंतर भाजपा नेत्यांनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “शरद पवार, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि तुमच्या पक्षाची सत्ता असताना सत्तेची मस्ती अंगात आणून घडलेली हत्याकांडे तुम्ही सोयीस्कर विसरले आहात. पवार गोवारी विसरले, पवार मावळचा गोळीबार विसरले, पवार मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही विसरले. हे सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात घडले,” अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

“गोवारी हत्याकांड घडले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. या हत्याकांडातील मरण पावलेल्या निष्पाप जीवांच्या कुटुंबीयांना न भेटता, जखमींची विचारपूस न करता पवार साहेब त्याच रात्री मुंबईला गुपचूप निघून गेले. इतके असंवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात कोण काय बोलले होते, तेही पवारांनी आठवले पाहिजे. मावळचा गोळीबार झाला तेव्हा पवारांना जालीयनवाला हत्याकांड आठवले नाही. पवार, या सगळ्या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले. डोळ्यात अश्रू आहेत. अजूनही जखमा ओल्या आहेत. मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच “शरदवासी” म्हणायचे का?” असा खोचक सवाल बावनकुळे यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

गुजरात उच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाडचा जामीन अर्ज फेटाळला

आदित्य ठाकरेंच्या मनपाविरोधातील मोर्चाचे शिंदेंविरोधातील सभेत रूपांतर

ममतांचा दुखावलेला पाय निवडणुकीत करामत करणार?

भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री म्हणतो, १०० हा माझ्यासाठी केवळ आकडा!

आमदार अतुल भातखळकर यांचा शरद पवारांवर निशाणा

शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “घसरण्याचेही एक वय असते शरद पवार, ८३ व्या वर्षी आपल्या निम्म्या वयाच्या नेत्याबाबत ही भाषा वापरणे शोभते का आपल्याला? इतके नैराश्य,” अशी घाणाघाती टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा