27 C
Mumbai
Sunday, April 5, 2026
घरराजकारणकाँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नव्हते

काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नव्हते

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नव्हते असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हनंतर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल देत महाराष्ट्रातील मराठा समाजचे आरक्षण घटनाबाह्य ठरवले आहे. महाराष्ट्राचे सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करायला अपयशी ठरल्यामुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर महाराष्ट्राचे राजकारण तापले असून ठाकरे सरकारकडून केंद्र सरकारकडे बोट दाखवत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हेच करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले

भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून आघाडी सरकारने आरक्षण घालवले

ठाकरे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक

आरक्षणाची जबाबदारी ढकलायला मुख्यमंत्र्यांचा लाईव्हचा खटाटोप

मुख्यमंत्र्यांच्या या संवादानंतर भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. आपले अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेले विधान हे मराठा समाजाला अक्रोशीत करत आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांसमोर बाजू मांडायला कमी पडलात याची शिक्षा आता संपूर्ण समाजाला भोगावी लागत आहे. तुम्ही (मुख्यमंत्री) आज ज्यांच्यासोबत मांडीला मंडी लावून बसले आहात त्यांना आपण अजून ओळखले नाहीये. काँग्रेसची इच्छाच नाहीये की मराठा समजला आरक्षण मिळावे. त्यांची इच्छा असती तर याआधीच त्यांनी आरक्षण दिले असते. काँग्रेससोबत जोडल्या गेलेल्या १०० सधन मराठा कुटुंबांची इच्छा नाही की उर्वरित गरीब मराठा समाज हा आरक्षण मिळून पुढे जावा. त्यांची प्रगती व्हावी. या १०० सधन कुटुंबांची इच्छा नाही की त्यांच्या नावापुढे ‘मागासवर्गीय’ असे लिहिले जावे. शिवसेना फक्त सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसच्या या कारस्थानात सामील झाली हे वेदनादायी आहे.

उद्धवजी तुम्ही स्वतःचे अपयश झाकण्यासाठी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करण्याचे नाटक करत आहात. पण ज्यांच्या मांडीला मंडी लावून बसला आहात त्यांची इच्छाच नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मराठा समाजाचे आरक्षण टिकले असते तर त्याचे श्रेय भारतीय जनता पार्टीला मिळाले असते म्हणून हे आरक्षण टिकू दिले नाही पण आम्हाला श्रेय नका देऊ, श्रेय तुम्ही घ्या. असे चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा