29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारणभाजपाला श्रेय मिळू नये म्हणून आघाडी सरकारने आरक्षण घालवले

भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून आघाडी सरकारने आरक्षण घालवले

Google News Follow

Related

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. राज्य सरकारच्या या अपयशाचे खापर पूर्वीचे सरकार आणि केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न सध्याच्या ठाकरे सरकारकडून होत आहे. बुधवारी दुपारी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून याविषयीची पत्रकार परिषद घेण्यात आली. पण या नंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारची पिसे काढली. भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून आघाडी सरकारने आरक्षण घालवले असा घणाघात फडणवीसांनी केला आहे.

काय म्हणाले फडणवीस?
महाराष्ट्र सरकारच्या मराठा आरक्षणासंदर्भातील पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र गफडणवीस यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच हल्ला चढवला.

आपले अपयश लपवण्याकरता केंद्र सरकार आणि मागच्या सरकारवर जबाबदारी ढकलण्याचे काम सध्याचे महाराष्ट्र सरकार करत आहे. अर्धवट आणि खोटे बोलायचे काम अशोक चव्हाण आणि नवाब मलिकांनी केले. अरविंद सावंत यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही. कारण आम्ही कायदा आणला तेव्हा ते आमच्यासोबत सरकारमध्ये होते.

हे ही वाचा:

मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले

ठाकरे सरकारची सर्वोच्च न्यायालयावर आगपाखड

ठाकरे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक

आरक्षणाची जबाबदारी ढकलायला मुख्यमंत्र्यांचा लाईव्हचा खटाटोप

राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार सॉलिसिटर जनरल आणि अॅटर्नी जनरल यांनी मांडलेली भूमिका वेगळी होती. मात्र, हे खोटे आहे. या दोघांनीही न्यायालयात एकसारखीच भूमिका मांडली असल्याचे फडणवीसांनी सांगितले. तर महाराष्ट्राचा कायदा १०२ व्या घटना दुरुस्तीच्या पूर्वीचा आहे. मूळ कायदा हा घटना दुरुस्तीच्या कधीचाच आहे. आम्ही आणलेला कायदा हा अमेंडमेंट ऍक्ट असल्याचे फडणवीसांनी नमूद केले. पण हे सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. असे सांगताना सरकारला ते न्यायालयात मांडायचे नव्हते असा आरोप फडणवीसांनी केला आहे. केंद्र सरकारकडे पाठवत आपण हात झटकण्याचा राज्याचा प्रयत्न आहे, पण असे चालणार नाही. राज्याला पूर्ण कार्यवाही करावी लागेल असे फडणवीस म्हणाले.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर पण हल्ला चढवला. नवाब मलिकांना खोटे बोलण्याचा रोग लागला आहे. केंद्रात मागासवर्ग अायोग नाही असे खोटे विधान त्यांनी केले. वास्तविक केंद्रात मागासवर्ग अायोग आहे आणि भगवान लाल सहानी त्याचे अध्यक्ष आहेत अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा