29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर राजकारण घरी बसून खुर्ची कशाला उबवताय? तोंड काळं करा

घरी बसून खुर्ची कशाला उबवताय? तोंड काळं करा

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हनंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. घरी बसून खुर्ची कशाला उबवताय असा संतप्त सवाल त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केला आहे.

बुधवार, ५ मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्वपूर्ण निकाल देत महाराष्ट्रातील मराठा समाजचे आरक्षण घटनाबाह्य ठरवल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. महाराष्ट्राचे सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करायला अपयशी ठरल्यामुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आहे. पण तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर केंद्र सरकारकडे बोट दाखवत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारकडून सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हेच करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नव्हते

भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून आघाडी सरकारने आरक्षण घालवले

ठाकरे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक

आरक्षणाची जबाबदारी ढकलायला मुख्यमंत्र्यांचा लाईव्हचा खटाटोप

पण मुख्यमंत्र्याच्या या फेसबुक लाईव्हचा भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी समाचार घेतला आहे. एका मागून एक अशी तीन ट्विटची मालिका लिहीत भातखळकरांनी ठाकरे सरकारची लक्तरे वेशीवर टांगली. “सगळ्यात आधी सर्व काही केंद्राने करावे आम्ही फक्त घरी बसून वसुली करणार” असे ट्विट करत एक सणसणीत चपराक अतुल भातखळकर यांनी लगावली.

तर प्रत्येक गोष्ट मोदींवर ढकलायची तर तुम्ही घरी बसून खुर्ची का उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळं करा आणि बसा घरी निवांत काडी लावून असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

आपल्या सगळ्यात शेवटच्या ट्विटमध्ये “यांना काहीच झेपत नाही, जमत नाही, कळत नाही, फक्त फुकाची बडबड, तोंडाची वाफ..काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभलाय असा एक खोचक टोला भातखळकरांनी लगावला आहे.”

 

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा