29.4 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरराजकारणडॉ. प्रकाश आमटेंच्या प्रकृतीची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस

डॉ. प्रकाश आमटेंच्या प्रकृतीची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस

Google News Follow

मंगळवार, २ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन डॉ. प्रकाश आमटे यांची भेट घेत, त्यांची विचारपूस केली आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांना रक्ताचा कर्करोग आहे. त्यामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली असता पुणे दौरा आटपून रात्री त्यांनी डॉ. आमटे यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रमुख डॉक्टर देखील उपस्थित होते. या भेटीनंतर त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे, मुलगा डॉ. कौस्तुभ आमटे आणि इतर कुटुंबियांशी बोलून त्यांनी प्रकाश आमटे यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेतली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे डॉ. प्रकाश आमटे हे द्वितीय पुत्र आहेत. १९७३ पासून प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे तसेच इतर साथीदारांसह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा इथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात. याशिवाय जखमी वन्य प्राण्यांवर देखील उपचार करतात.

हे ही वाचा:

तालिबानच्या छळामुळे शीखांनी सोडले अफगाणिस्तान; दिल्लीत येणार

करवा चौथवरील टिप्पणी अपमानास्पद; रत्ना पाठक- शाह, पिंकविलाला नोटीस

विचार बदलला म्हणून काय ठार माराल? उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

अविनाश भोसलेंचा ड्युप्लेक्स फ्लॅट तर छाब्रियांची जमीन जप्त

डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर ‘डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो’ हा चित्रपट २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटामुळे आमटे दाम्पत्य यांचं कार्य सर्व लोकांपर्यंत पोहचले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा