33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरदेश दुनिया'पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे श्रीलंकेला नवा श्वास मिळाला!'

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे श्रीलंकेला नवा श्वास मिळाला!’

Google News Follow

Related

राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारमुळे आम्हाला नवा श्वास मिळाला आहे. मी आणि माझ्या देशातील नागरिकांच्यावतीने पंतप्रधान मोदी, भारत सरकार आणि भारतातील जनता यांचे मी आभार मानतो, अशा शब्दांत श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी बुधवारी संकटग्रस्त श्रीलंकेला भारताने केलेल्या मदतीबद्दल आदराची भावना व्यक्त केल्या आहेत.

भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी आभार मानले आहेत. विक्रमसिंघे यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आमच्या आर्थिक पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांमध्ये आमचा आमच्या जवळचा शेजारी देश भारताने दिलेल्या मदतीचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. श्रीलंकेतील जनतेच्या वतीने आपण पंतप्रधान मोदी, भारत सरकार आणि भारतातील जनतेचे आभार मानतो, असे विक्रमसिंघे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.

प्रचंड जनक्षोभानंतर आपल्या पत्नीसह देश सोडून गेलेल्या गोताबाया राजपक्षे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथम मालदीव येथे पलायन केले व त्यानंतर ते सिंगापूर येथे गेले. यानंतर विक्रमसिंघे यांची काळजीवाहू अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर विक्रमसिंघे यांच्यावर यापूर्वीच म्हणजे १३ मे रोजी पंतप्रधानपदाचा कार्यभारही सोपविण्यात आला आहे. राजपक्षे यांच्या पलायनानंतर श्रीलंका भयंकर आर्थिक संकटांना तोंड देत आहे. देशातील लाखो जनता, अन्न, औषधे, इंधन आणि अन्य जीवनावश्यक खरेदी करण्यास असमर्थ ठरले असून गेल्या सात दशकातील दयनीय स्थिती येथील जनता अनुभवत आहे. कोलंबोसह अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल खरेदीसाठी शेकडो लोकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे, काहीवेळा पोलिस आणि लष्कराशी संघर्षाचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकेतील ही परिस्थिती बघून काळजीवाहू अध्यक्ष आणीबाणी लावण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचा जनतेने तीव्र विरोध केला होता.

हे ही वाचा:

अविनाश भोसलेंचा ड्युप्लेक्स फ्लॅट तर छाब्रियांची जमीन जप्त

उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक

राष्ट्रकुल स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदकांवर भारताची मोहोर

१००, २००च्या बनावट नोटा छापणाऱ्या चारजणांच्या गठड्या वळल्या!

संसदेच्या कामकाजाला नव्याने सुरुवात

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय गोंधळानंतर, गेल्या महिन्यात श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले रानिल विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या कामकाजाला नव्याने सुरुवात होणार आहे. श्रीलंकेच्या संसदेची आज अध्यक्ष विक्रमसिंघे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सत्रासाठी बैठक होणार आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा