28.8 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरराजकारण'राहुल गांधींनी काँग्रेस सोडून स्टँड-अप कॉमेडियन व्हावे!'

‘राहुल गांधींनी काँग्रेस सोडून स्टँड-अप कॉमेडियन व्हावे!’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हाणला टोला

Google News Follow

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून स्टँड-अप कॉमेडियन बनावे, असे म्हटले. इंदूर येथे झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी ही टिप्पणी केली.

“राहुल गांधी ज्या पद्धतीने नक्कल करत आहेत, ते पाहता मला वाटते की त्यांनी पक्ष सोडून स्टँड-अप कॉमेडियन बनावे,” असे फडणवीस यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधींमुळे काँग्रेस पक्ष ‘बेरोजगार’ झाला असल्याने त्यांनी विनोदी कलाकार होण्याचा निर्णय घेतला, तर निदान त्यांना काही काम तरी मिळेल.

राहुल गांधींनी इंदूरमधील कार्यक्रमात पुलकित मणी नावाच्या स्टँड अप कॉमेडियनला आमंत्रित केले होते. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल मंचावर केली. त्याने राहुल गांधींना मिठ्या मारत मोदींच्या विदेश दौऱ्यातील राष्ट्रप्रमुखांच्या भेटीची खिल्ली उडविली. त्यावरून फडणवीसांनी राहुल गांधींना हा टोला लगावला.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेश पोलिसांत ९१२ जणांची नियुक्ती

राहुल गांधींना डोवाल यांची सुपारी मिळाली आहे काय?

काँग्रेस हा विदुषकांचा पक्ष बनलाय!

पेट्रोल पंपांवर यूपीआय पेमेंटबाबत मोठा बदल

फडणवीस यांनी काही यूपीआय व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतच्या चिंतेवरही भाष्य केले. या मुद्द्यावरून एक विशिष्ट कथानक तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा