27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरराजकारणलहानगीने मुख्यमंत्र्यांना विचारलं, सुट्टीत गुवाहाटीला फिरायला घेऊन जाणार का?

लहानगीने मुख्यमंत्र्यांना विचारलं, सुट्टीत गुवाहाटीला फिरायला घेऊन जाणार का?

Related

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एका लहान मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबईतील नंदनवन बंगल्यात या लहानगीची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. या व्हिडीओमध्ये ही पाच ते सहा वर्षांची मुलगी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारताना दिसत आहे. तिच्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे तिला देत आहेत.

“येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत मला गुवाहाटीला फिरायला घेऊन जाणार का?” असा प्रश्न या मुलीने विचारला आणि एकच हशा पिकला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “नक्कीच, कामाख्या मातेच्या दर्शनासाठी आपण जाऊया.”

“जेव्हा आसाममध्ये पूर आला होता तेव्हा तुम्ही पाण्यातून वाट काढत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेला होतात. मी पण पूरग्रस्तांना मदत केली तर मुख्यमंत्री बनू शकते का?” असा प्रश्नही या लहानगीने एकनाथ शिंदेंना विचारला. त्यावर त्यांनीही सांगितलं की, “हो, बनू शकतेस.”

“पहिले मला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत होते पण मी धर्मवीर सिनेमा पाहिला आणि आता तुम्ही देखील मला आवडता,” असंही मुलीने सांगितले. एकनाथ शिंदे हे त्यांच्या नातवाला भेटायला कधी जाणार असा प्रश्नही तिने विचारला.

हे ही वाचा:

…पण उद्धव म्हणाले, राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही!

“शरद पवारांनी वेळ साधून शिवसेना फोडली”

एकनाथ शिंदेंकडून शिवसेना भवनावर दावा?

मुंबईच्या माजी आयुक्तांची सीबीआयकडून चौकशी

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील मुलीचं नाव अन्नदा दामरे असून तिचं वय जवळपास पाच ते सहा वर्ष असावं. मुंबईतील नंदनवन बंगल्यात या चिमुकलीची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. यावेळी तिने काही प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारले आणि मुख्यमंत्र्यांनीही त्याची उत्तरं तिला दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,925अनुयायीअनुकरण करा
16,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा