27 C
Mumbai
Wednesday, August 17, 2022
घरविशेषस्विमिंग पूलमध्ये पडून लहानग्याचा मृत्यू; धक्कादायक व्हीडिओ व्हायरल

स्विमिंग पूलमध्ये पडून लहानग्याचा मृत्यू; धक्कादायक व्हीडिओ व्हायरल

Related

नाशिकच्या एका परिवारावर लोणावळ्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लहान मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्याला गेले असता लहानग्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. याचा व्हीडिओ व्हायरल होत असून मुलाच्या झालेल्या त्या दुर्दैवी मृत्युमुळे सर्वत्र हळहळ आणि दुःख व्यक्त होत आहे.

शिवबा पवार असे या मयत झालेल्या चिमुरड्याचे नाव असून तो अवघ्या दोन वर्षांचा होता. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे पवार कुटुंब लोणावळ्याला गेले होते. लोणावळ्यात त्यांनी स्विमिंग पूल असणारा व्हीला बुक केला होता. फिरायला गेले असताना शिवबा स्विमिंग पुलच्या आवारात एकटाच खेळत होता. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो थेट स्विमिंग पूलमध्ये पडला. पूलमध्ये पडल्यानंतर त्या मुलाने १५ मिनिटे स्वतःचा जीव वाचविण्यासाठी धडपड केली.  त्याच्या आजूबाजूला इतर कोणीही नव्हते त्यामुळे त्याला स्विमिंग पूलमध्ये पडताना कोणीच बघितले नाही. अखेर या चिमुकल्याला त्याचा जीव गमवावा लागला.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या १२ खासदारांना Y दर्जाची सुरक्षा

…पण उद्धव म्हणाले, राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही!

“शरद पवारांनी वेळ साधून शिवसेना फोडली”

एकनाथ शिंदेंकडून शिवसेना भवनावर दावा?

बऱ्याच वेळापासून मुलगा दिसत नसल्याने आई-वडिलांनी मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केलीअसता आई- वडिलांना स्विमिंग पुलमध्ये मुलाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. मुलाला तरंगताना पाहून आई वडिलांनी फोडला हंबरडा फोडला. ही संपूर्ण दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. नाशिक शहरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,914चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा