34 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरराजकारणसमाजवादी पक्षानंतर आता काँग्रेसही इस्राएलच्या विरोधात?

समाजवादी पक्षानंतर आता काँग्रेसही इस्राएलच्या विरोधात?

Google News Follow

Related

फोर्टमधील काळाघोडा परिसरातील चौकाला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. समजावादी पार्टीपाठोपाठ आता काँग्रेसनेही या नावाला विरोध केला आहे. मराठी नावांसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेने या चौकाला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचं नाव देण्यास मंजुरी का दिली? असा सवालही काँग्रेसने केला आहे.

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काळाघोडा परिसरातील चौकाला इस्रायलचे माजी पंतप्रधान सिमॉन पेरेस यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून रवी राजा यांनी शिवसेनेला घेरले आहे. पेरेस यांचे नाव या चौकाला देण्यासाठी २०१८ मध्ये प्रस्ताव देण्यात आला होता. तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा प्रस्ताव आणला होता. काही दिवसातच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सभागृहातही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नंतर या चौकात इस्रायलच्या माजी पंतप्रधानांच्या नावाने पाटीही लावली गेली. “मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ज्या व्यक्तीचे काहीही योगदान नसताना मुंबईतील चौकाला या व्यक्तीचं नाव का?” असा सवाल रवी राजा यांनी केला आहे.

हे ही वाचा:

कोणी केली सिमॉन पेरेस चौकाचे नाव बदलण्याची मागणी?

ज्या काँग्रेस पक्षाकडून मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासात योगदान काय? असा प्रश्न विचारून सिमॉन पेरेस यांच्या नावाचा विरोध केला जात आहे.  त्याच काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळात दिल्लीत मार्शल टिटो यांचे नाव रस्त्याला दिले गेले आहे. मार्शल टिटो हे युगोस्लाव्हिया या देशाचे हुकूमशहा होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा प्रश्न कोणत्या तोंडाने विचारात आहे? असा सवाल केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा