26 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरराजकारणकाँग्रेसकडून मोदी सरकारची नव्हे, देशाची बदनामी

काँग्रेसकडून मोदी सरकारची नव्हे, देशाची बदनामी

Google News Follow

Related

टूलकिट प्रकरणावरुन देशात सध्या जोरदार राजकारण रंगलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या टूलकिट प्रकरणावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. काँग्रेस पक्षाने कोरोनाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करून मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रचार योजना आखल्याचं उघडकीस आलंय. संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संघर्ष करत असताना अशा प्रकारे देशाच्या विरोधात काम करणे निषेधार्ह आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केली.

सोशल मीडियाच्या जगात ज्याला टूलकिट म्हणतात असे काँग्रेस पक्षाचे एक सूचनापत्र उघडकीस आले आहे. त्यामध्ये मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी काय काय करावे याच्या सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. राजकीय विरोधासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करण्यापर्यंत काँग्रेस गेली. तसेच कोरोनाच्या प्रसाराबाबतही हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव करून निवडक टीका करण्याचे डावपेच काँग्रेसने आखल्याचे उघड झाले आहे. हे धक्कादायक आणि निंदनीय आहे. या सर्व प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केलीय.

पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या रिसर्च टीमने तयार केलेल्या या Toolkit मध्ये शतकानुशतकांपासून हिंदू समाजाच्या श्रद्धेचं प्रतीक असणारा कुंभमेळा हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर असल्याची चर्चा करण्याची सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सुपर स्प्रेडर कुंभ असा नॅरेटीव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असून तो आणखी वाढविण्यासाठी समविचारी आंतरराष्ट्रीय मीडिया व पत्रकारांशी हातमिळवणी करण्याची सूचना त्यामध्ये देण्यात आली आहे. ईदसाठी जमलेल्या गर्दीबाबत मात्र कोणतीही टिप्पणी करू नये, अशी सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचंही पाटील म्हणाले. केवळ काँग्रेसचेच कार्यकर्ते कोरोना काळात जनतेला मदत करत आहेत असे भासवण्यासाठी हॉस्पिटल्समध्ये बेड आणि व्हेंटिलेटर सारखी इतर सामुग्री अडवून ठेवावी आणि केवळ काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरूनच ती उपलब्ध करून दिली जावी, अशी आणखी एक अमानूष सूचना या टूलकिटमध्ये आहे, असा आरोपही पाटील यांनी केलाय.

हे ही वाचा:

समुद्राकडून ६७ हजार किलो कचरा साभार परत

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, रासायनिक खतांच्या सबसिडीत १४०% वाढ

शेतकऱ्यांचे खरेखुरे मित्र पंतप्रधान मोदींचा खताबाबत शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई महापालिकेच्या विरोधात भाजपा सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार

काँग्रेसच्या टूलकिट मधील धक्कादायक सूचनांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला ‘इंडियन स्ट्रेन’ किंवा ‘मोदी स्ट्रेन’ म्हटले जावे, अशी सूचना आहे. यासोबतच पीएम केअर फंडबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांद्वारे सातत्याने संभ्रम निर्माण केला जावा आणि जर एखाद्या सेलिब्रिटीने यामध्ये दान केले तर त्यांना सोशल मीडियावर टार्गेट करण्यात यावे, असेही सांगण्यात आलंय. एकूणच हे टूलकिट धक्कादायक आहे. त्याची निर्मिती आणि वापर या संदर्भात केंद्रीय तपास यंत्रणांनी सखोल तपास करून कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचं पाटील म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा