32 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरराजकारणकाँग्रेसची डबल ढोलकी! फडणवीसांनी जुना व्हिडिओ दाखवत घेरले

काँग्रेसची डबल ढोलकी! फडणवीसांनी जुना व्हिडिओ दाखवत घेरले

एसआयआरवरून कांगावा करणाऱ्यांना दाखवला आरसा

Google News Follow

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनावरून (एसआयआर) राजकारणात घमासान सुरू असून ही प्रक्रिया रद्द करण्याची आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेससह इंडी आघाडीतील घटक पक्षांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस या मुद्द्यावर भूमिका घेत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या संसदीय चर्चेचा दाखला देत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तत्कालीन केंद्रीय कायदेमंत्री आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांचा संसदेतील भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

फडणवीस यांनी ‘एक्स’वर हा व्हिडिओ शेअर केला. त्याला ‘काँग्रेसची डबल ढोलकी!’ असे शीर्षक देत त्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या विरोधाची तुलना पक्षाच्या पूर्वीच्या भूमिकेशी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस प्रत्येक व्यासपीठावरून एसआयआरच्या विरोधात जनमत भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काँग्रेसने आधी त्यांच्या सत्ताकाळातील तत्कालीन कायदेमंत्री कपिल सिब्बल यांचे संसदेतील अधिकृत नोंदींमधील वक्तव्य ऐकावे, असा टोला त्यांनी लगावला. ‘काँग्रेसच्या राजकारणाचे रंग बदलले, पण संसदेतील नोंदी बदलत नाहीत. आपणही ऐका आणि ठरवा, कोण खरे आणि कोण खोटे?’ अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

कपिल सिब्बल यांच्या जुन्या व्हिडिओमध्ये काय?

देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कपिल सिब्बल मतदार यादीतून नावे वगळण्याच्या प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देताना दिसतात. मतदाराचे नाव एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित होणे, मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे नावात बदल होणे किंवा मतदाराचा मृत्यू होणे, अशा परिस्थितींमध्ये मतदार यादीतून नाव वगळले जाऊ शकते, असे सिब्बल सांगत असल्याचे या व्हिडिओत दिसते.

हे ही वाचा:

स्मित माछर यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार जाहीर

पाकिस्तानचा नकाशा बदलणार? चार प्रांतांच्या विभाजनाचा प्रस्ताव

‘मेड इन इंडिया’ खेळण्यांचा जगभरात डंका

“पत्रकार परिषदेत आरोप नको, न्यायालयात पुरावे द्या”

एखाद्या मतदाराचे नाव चुकीने वगळले गेले असेल, तर संबंधित व्यक्तीने निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन नाव पुन्हा नोंदवण्याची मागणी करावी, असेही ते सांगतात. संबंधित अधिकाऱ्याला मतदाराची नोंदणी रोखता येणार नाही, असे वक्तव्यही व्हिडिओमध्ये असल्याचे फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले आहे. व्हिडिओमध्ये सिब्बल यांनी ६ लाख ४४ हजार १०५ मतदारांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची मागणी केल्याचा आकडाही नमूद केला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा