32 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणअजित पवारांच्या भाषणावरून वाद

अजित पवारांच्या भाषणावरून वाद

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेचं लोकार्पण केलं. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. मात्र, या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन आता राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आकांतांडव केला आहे.

देहू येथे आयोजित करण्यात आलेल्या शिळा लोकार्पणाच्या कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. त्यानंतर अजित पवार यांनी इशारा करत आपण भाषणाला जा असे सुचवले त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झाले.

हे ही वाचा:

‘देशात विकास आणि आराध्य एकत्र पुढे गेलं पाहिजे’

संत तुकाराम शिळामंदिर हे भक्ती आणि ज्ञानाचा आधार

वट पौर्णिमेसंबंधित वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांवर होतेय टीका

प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. प्रकाश बाबा आमटे रुग्णालयात

या कार्यक्रमाला राजशिष्टाचाराचा भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पंतप्रधानांच्या स्वागतापासून या कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत अजित पवार उपस्थित होते. मात्र, अजित पवारांना भाषण देता न आल्याने सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, “ अजित पवारांना बोलू न देणं हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना न बोलू देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे जे झालं ते अयोग्य आहे.” अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवला. जाणूनबुजून अजित पवार यांना भाषणापासून वंचित ठेवल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा