33 C
Mumbai
Tuesday, June 14, 2022
घरधर्म संस्कृतीसंत तुकाराम शिळामंदिर हे भक्ती आणि ज्ञानाचा आधार

संत तुकाराम शिळामंदिर हे भक्ती आणि ज्ञानाचा आधार

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, १४ जून रोजी महाराष्ट्रातील देहू येथे आले असून त्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. पुणे येथे आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तसेच यावेळी मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देहूमध्ये दुपारी वारकऱ्यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी संत तुकाराम यांचे दर्शन घेतले. संत तुकारामांचे विचार अनेकांना प्रेरित करतात. तसेच आपल्याला इतरांची सेवा करण्यास आणि समाजाची सेवा करण्यास प्रेरित करतात, असं म्हटलं. तसेच त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं की, देहूच्या या भूमीवर येण्याचं भाग्य मला लाभले, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

“आज संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले. ही शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा आधार असल्याचे मी मानतो. देहू येथील शिळामंदिर फक्त भक्तीच्या शक्तीचे केंद्र नसून त्यामुळे भारताचे सांस्कृतिक भविष्य प्रशस्त होणार आहे. या पवित्र स्थानाचे पुन:निर्माण केल्यामुळे मंदिर समितीचे मी आभार व्यक्त करतो,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

वट पौर्णिमेसंबंधित वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांवर होतेय टीका

प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. प्रकाश बाबा आमटे रुग्णालयात

भारतातील वेबसाईट्सवर हॅकर्सचा हल्ला

नुपूर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरली आणि वर आली. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी १३ दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नाही. तुकाराम महाराज १३ दिवस ज्या शिळेवर उपोषणाला बसले होते, तीच शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू मंदिरात आणून ठेवली होती. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा आग्रह होता, म्हणून देहूतील मुख्य मंदिरात ही स्थापीत केली असून मंदिराला शिळा मंदिर असे संबोधले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,916अनुयायीअनुकरण करा
10,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा