28 C
Mumbai
Friday, June 24, 2022
घरक्राईमनामाभारतातील वेबसाईट्सवर हॅकर्सचा हल्ला

भारतातील वेबसाईट्सवर हॅकर्सचा हल्ला

Related

भारतात मंगळवार, १४ जून रोजी सायबर हल्ला झाला आहे. भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. नुपूर शर्माच्या यांच्या वक्त्यव्यावरून मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे. त्यात ठाणे पोलीस, सायबर पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस दलाची मुख्य वेबसाईट चा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या समूहाने ‘opspatuk’ किंवा StrikeBack म्हणजेच प्रतिहल्ला हे ऑपरेशन सुरू केले आहे. त्यामुळेच भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक झाल्या आहेत. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच एक संदेश सर्व वेबसाईटवर देण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या अनेक वेबसाईट हॅक करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये ठाणे पोलीस, सायबर पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस दलाची मुख्य वेबसाईट चा समावेश आहे. यातून सरकारकडे असलेली अतिशय गुप्त आणि महत्त्वाची माहिती चोरली जाण्याची देखील शक्यता आहे. या वेबसाईट मलेशियातील हॅक्टिव्हिस्ट ग्रुप नावाच्या ड्रगन फोर्स कडून हॅक करण्यात आलेल्या असल्याचे कळते. या वेबसाईट हॅकरच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हे ही वाचा:

अमेझॉनला ‘या’ प्रकरणात दोनशे कोटींचा दंड

मोदी सरकार १० लाख नोकऱ्या देणार

नुपूर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

पैगंबर यांच्याबद्दलच्या विधानाचा वाद हा भारताचा अंतर्गत मुद्दा

ठाणे शहर पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर लिहिलेल्या संदेशात याची नोंद करण्यात आली आहे. हॅकर्सनी लिहिलं आहे की, “भारत सरकार, तुम्ही इस्लामच्या संदर्भात वारंवार अडथळे आणता, तुम्हाला सहिष्णुता दिसत नाही, जगभरातील मुस्लिमांची लवकरात लवकर माफी मागा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही.” याप्रकरणी, योग्य ती लवकरात लवकर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,935चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा