30 C
Mumbai
Tuesday, June 14, 2022
घरक्राईमनामानुपूर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

नुपूर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

Related

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे पडसाद उमटलेले आहेत. अशातच आता नुपूर शर्मा यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका संशयित तरुणाला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. नदीम असे या तरुणाचे नाव आहे.

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांच्याविषयी नदीम याने आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या तरुणाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करताना दिसत आहे. हा व्हिडीओ एडिट करण्यात आला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी नदीमवर गुन्हा दाखल केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर एसपी सिटी सुरेंद्र नाथ तिवारी म्हणाले की, “खानापूर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या तरुणाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी तरुण नदीमला अटक केली.” पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी आज देहू दौऱ्यावर

आज राहुल गांधींची पुन्हा ईडी चौकशी

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा पुण्यतिथीनिमित्त मोखाड्यात कार्यक्रम

“राहुलजींनी गांधीच राहावं, सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये”

नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटले होते. तर आखाती देशांमध्येही त्याचे पडसाद दिसून आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,915अनुयायीअनुकरण करा
10,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा