31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरराजकारणकाँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत, तरी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपाचीच सरशी! नेमके काय घडले लातूरमध्ये?

काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत, तरी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपाचीच सरशी! नेमके काय घडले लातूरमध्ये?

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यात चाकूर नगरपंचायतीत पक्षाचे बहुमत नसतानाही नगराध्यक्ष बसवण्याची जादू करून दाखवली आहे. स्थानिक राजकीय समीकरणे जुळवून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हा चांगलाच धक्का मानला जात आहे. यासोबतच शिरूर अनंतपाळ येथे भाजपाचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून आले आहेत. या दोन्ही विजयांबद्दल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन पक्षांना मिळून आठ जागा मिळाल्या आहेत तर भाजपाचे उमेदवार तीन जागांवर निवडून आले आहेत. तथापि, भाजपाने स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे जुळवून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळविण्यापासून रोखले आहे. या नगरपंचायतीत बुधवारी नगराध्यक्षपदी अपक्ष नगरसेवक कपिल माकने निवडून आले तर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक अरविंद बिराजदार यांची निवड झाली.

हे ही वाचा:

‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’

संजय राऊतांचे ‘ते’ पत्र पाहून त्यांची कीव वाटते

‘हिजाब’ वादाचे कर्नाटकबाहेर पडसाद….भाजप – काँग्रेस आमनेसामने !

संजय राऊतांचे ‘ते’ पत्र पाहून त्यांची कीव वाटते

नगरपंचायत निवडणुकीत जेथे भाजपाला बहुमत मिळाले नाही तेथेही पक्ष राजकीयदृष्ट्या महाविकास आघाडीवर मात करेल, असा इशारा चंद्रकांतदादा पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दिला होता. त्यानुसार पक्ष कार्यकर्त्यांनी चाकूरमध्ये यश मिळविले.

लातूर जिल्ह्यातच शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत भाजपाने ९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते. तेथे मंगळवारी नगराध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका मायाताई धुमाळे यांची निवड झाली. उपनगराध्यक्षपदी भाजपाच्याच नगरसेविका सुषमा मठपती यांची निवड झाली. चंद्रकांत दादा पाटील यांनी चाकूर व शिरूर अनंतपाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे तसेच या यशाबद्दल माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह सर्व नेते, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. राज्यात नुकत्याच झालेल्या १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकून पहिला क्रमांक मिळविला आहे तसेच स्पष्ट बहुमत मिळालेल्या नगरपंचायतींच्या बाबतीतही भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा