27 C
Mumbai
Thursday, March 23, 2023
घरराजकारणफडणवीसांनी 'अजितदादां'ची केली कोंडी आणि मारली मुसंडी

फडणवीसांनी ‘अजितदादां’ची केली कोंडी आणि मारली मुसंडी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांचे काव्यात्मक प्रत्युत्तर

Google News Follow

Related

विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरु आहे. या चर्चेच्यावेळी विरोधकांनी अर्थसंकल्पावर मोठी टीका केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील अर्थसंकळपातील निधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचं प्रयत्त्न केला. अजित पवार म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पात शिवसेनेला ३४ टक्के निधी आणि भाजपला ६६ टक्के निधी दिला असा आरोप केला.

पवार यांच्या या आरोपाला खणखणीत पण काव्यात्मक शैलीमध्ये उत्तर दिले आहे. तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून मारली आम्ही मुसंडी असे म्हणत फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्या प्रमाणे कवितेतून उत्तर दिले. फडणवीसांच्या या उत्तराने सभागृहात एकच खसखस पिकली.

फडणवीस म्हणाले , अजितदादा मला तुमचा स्पष्टवक्तेपणा आवडतो. तुम्ही सांगितले, अर्थसंकल्पात शिवसेनेला ३४ टक्के निधी आणि भाजपला ६६ टक्के निधी. पण सध्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालल्यावर काय परिणाम होतो? पाहा. २०२०-२१च्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला २ लाख ४८ हजार ३८८ कोटी निधी, काँग्रेसला १ लाख २१ हजार १४ कोटी निधी आणि सगळ्यात मोठा पक्ष असलेला शिवसेना, आता तर आम्ही संख्येने मोठे आहोत, आणि ते संख्येने कमी आहेत. पण तरीही सगळ्यात मोठा पक्ष असलेला शिवसेनेला ६६ हजार कोटी निधी दिला होता.

तुमच्या काळात सर्वात मोठा पक्ष असलेल्या तत्कालिन शिवसेनेला ४,३५,६९१ कोटी रुपयांपैकी केवळ १५ टक्के निधी दिला होता. फक्त १५ टक्के दादा, १५ टक्के म्हणजे जेव्हा त्यांचे ५६ होते तेव्हा १५ टक्के निधी आणि आता आमच्यासोबत ४० आहेत, तरीही आता तो ३४ % आहे. तुम्ही त्यांची कोंडी केली म्हणून तर हा दिवस आला. त्यामुळे अजितदादा रामदास आठवले यांच्या शब्दात सांगायचे तर तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून मारली आम्ही मुसंडी असे म्हणत फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेतील हवाच काढून टाकली. तुमच्या काळात, कोरोनाच्या काळात वेगळेच अमृत चालत होते, त्यामुळे तुम्हाला पंचामृत समजणार तरी कसे? असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला.

हे ही वाचा:

ग्राहक म्हणून तुमचे हक्क तुम्हाला माहिती आहेत का ?

सावधान महाराष्ट्रात एन्फ्लूएंझा विषाणूचा धोका वाढतोय

अयोध्येच्या राम मंदिरासाठी दणदणीत देणग्या

‘नुक्कड’ फेम समीर खक्कर यांचे रुग्णालयात निधन

आजि देतो पोटभरी । पुरें म्हणाल तोवरि ॥

संत तुकाराम महाराजांच्या ओवींचा संदर्भ घेत अजित पवारांनी “अर्थसंकल्पात शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना ३४ टक्के निधी देण्यात आला. तर, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी मंत्र्यांना तब्बल ६६ टक्के निधी देण्यात आला. ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. जेवोनिया तृप्त कोण झाला?’,” असा निशाणा साधला होता. त्याला उत्तर देतांना फडणवीस म्हणाले , अजितदादा म्हणाले,कढी बोलाचीच भात । जेऊनिया कोण तृप्त झाला ॥ पण हे महाविकास आघाडीच्या संदर्भात होते.आमच्या सरकारसंदर्भात ते असे आहे. आजि देतो पोटभरी । पुरें म्हणाल तोवरि ॥ असा टोला अजित पवार यांना लगावला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,882चाहतेआवड दर्शवा
2,029अनुयायीअनुकरण करा
65,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा