27 C
Mumbai
Wednesday, March 18, 2026
घरराजकारण'राज्यसभा निवडणूक निकालानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय'

‘राज्यसभा निवडणूक निकालानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय’

Google News Follow

Related

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला दणका देत भाजपाचे तीनही उमेदवार निवडून आले. भाजपाच्या या विजयानंतर मुंबईत भाजपा कार्यालयासमोर देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले.

“कोल्हापूरचे आपले पैलवान धनंजय महाडिक हे संजय राऊतांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहेत. आपले लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना हा विजय समर्पित आहे. शारीरिक प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी येऊन मतदान केलं, त्यांच्या मतामुळेच आपला तिसरा उमेदवार नीट जिंकून आला आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर अनेक लोकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काही लोक बावचळले आहेत, पिसाटले आहेत. आपण जिंकलो आहोत. जिंकलेल्यांनी नम्रता सोडायची नसते. त्यामुळे त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करूयात,” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. “संजय राऊतांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सत्ता त्यांच्या डोक्यात गेली आहे,” असा खोचक सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

“कोणामुळे आपला विजय झाला आहे हे त्यांना खरंच माहित असेल तरी ते काहीही करणार नाहीत. त्यांना सरकार टिकवायचे आहे. त्यांच्या पाठबळावर ही सत्ता आहे. त्यांच्यावर कारवाई केली तर तेच निघून जातील,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

हे ही वाचा:

“संजय राऊत ब्रह्मदेव आहेत काय? मतदान दिलं नाही हे कसं कळालं?”

प्रयागराजमध्ये हिंसाचारानंतर ६८ जणांना अटक

संत तुकारामांच्या अभंगातून संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

सोनिया गांधींना ईडीचे पुन्हा समन्स

“मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. केवळ आमच्याशी लढायचं म्हणून अनेक प्रकल्प थांबवून ठेवलं आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होत नाहीये. मुख्यमंत्र्यांची कार सुरू आहे पण सरकार बंद पडली आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. “आज शेतमाल खरेदीची अवस्था वाईट आहे. लोड शेडींग आहे. राज्य मागे चाललं आहे. तुम्ही जरी बेईमानीने सरकार घेतलं असेल तरीही राज्यकर्त्यांसारखे वागलं पाहिजे,” असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

“ही लढाई छोटी होती. मोठी लढाई बाकी आहे. येत्या काळात महानगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्या स्तरावर आपण त्यांना परास्त करू. २०२४ ला आपण सगळ्यांना पराभूत करू. कार्यकर्त्यांनी उत्साह कायम ठेवा. मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा लावायचा आहे त्यासाठी तयार राहा,” असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा