27 C
Mumbai
Friday, June 24, 2022
घरक्राईमनामाप्रयागराजमध्ये हिंसाचारानंतर ६८ जणांना अटक

प्रयागराजमध्ये हिंसाचारानंतर ६८ जणांना अटक

Related

शुक्रवारच्या नमाजानंतर दिल्लीतील जामा मशिदीबाहेर मुस्लिमांनी निदर्शने केली. तसेच कानपूर, लखनौ, प्रयागराज या शहरांमध्येही हिंसाचार घडला. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये हिंसाचार झाला असून नमाज झाल्यानंतर जमावाने निदर्शने केली आणि दगडफेक केल्याची घटना घडली. यात काही पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.

प्रयागराजमध्ये झालेल्या दगडफेकीत पोलीस अधिकारी जखमी झाले असून काही घरांमधून पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली आहे. प्रयागराजमधील हिंसाचारात डाव्या संघटना, पीएफआय, एआयएसए, सीएए आणि एनआरसी चळवळीला पाठिंबा देणारे लोक असल्याची माहिती प्रयागराज झोनचे एडीजी प्रेम प्रकाश यांनी दिली. संपूर्ण परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी जवळपास तीन तास लागले.

दरम्यान, प्रयागराजमध्ये हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटली असून ६८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर, सहारनपूरमध्ये ४८, हाथरसमध्ये ५०, मुरादाबादमध्ये २५, फिरोजाबादमध्ये ८, आंबेडकर नगरमध्ये २८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

संत तुकारामांच्या अभंगातून संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

सोनिया गांधींना ईडीचे पुन्हा समन्स

हनुमान ‘चाळीसा’ भाजपाला फळली; धनंजय महाडिक विजयी

‘निवडणूक लढवण्यासाठी नाही जिंकण्यासाठी लढवली’

पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे तरीही वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. शुक्रवार, १० जून रोजीच्या नमाजानंतर दिल्ली, लखनौ, कोलकातामध्ये मुस्लिमांनी निदर्शने केली. यानंतर महाराष्ट्रातील काही शहरांमध्येही निदर्शने करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,936चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा