29 C
Mumbai
Sunday, June 26, 2022
घरराजकारणहनुमान ‘चाळीसा’ भाजपाला फळली; धनंजय महाडिक विजयी

हनुमान ‘चाळीसा’ भाजपाला फळली; धनंजय महाडिक विजयी

Related

शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव, मविआला मोठा धक्का

 

राज्यसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अखेर भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीचा सगळा पटच उधळून लावला. धनंजय महाडिक यांच्या रूपातील तिसरा उमेदवारही चाळीसपेक्षा अधिक मते घेऊन निवडून आणत भाजपाने सरशी साधली. शुक्रवारी उशिरापर्यंत निकाल लागले नाहीत अखेर शनिवार, जो हनुमानाचा दिवस मानला जातो, त्या दिवशी सकाळी अवघ्या महाराष्ट्राला निकाल कळला तो धनंजय महाडिक जिंकल्याचा. ४१ मते घेऊन महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभूत केले. त्यामुळे भाजपाचे ३, शिवसेनेचा एक (संजय राऊत), राष्ट्रवादी काँग्रेसचा एक (प्रफुल्ल पटेल) आणि काँग्रेसचा एक (इम्रान प्रतापगढी) असे सहा उमेदवार राज्यसभेत निवडून गेले आहेत. महाडिक यांना पहिल्या पसंतीची २६ आणि एकूण ४१ मते पडली. तर संजय पवार यांना एकूण ३९ मते पडली.

गेल्या काही दिवसांत हनुमान चालिसाच्या पठनावरून बरेच राजकारण महाराष्ट्रात झाले. तशीच पहिल्या पसंतीची चाळीसपेक्षआ अधिक मते कुणाला याविषयी चर्चा राज्यसभेच्या निवडणुकीवरून सुरू होती. त्यात अखेर भाजपाला यश आले.

हे ही वाचा:

“फूल” टू कमाल

संविधान ‘बचाव’वाल्यांचा उच्छाद

स्नेहबंधनात बांधणारे ‘स्नेहालय’

नुपूर शर्मांवर कारवाईच्या मागणीसाठी मुस्लिमांची हिंसक आंदोलने

१० जून रोजी मतदान पार पडल्यानंतर मतमोजणीची प्रतिक्षा होती. पण भाजपाने मविआच्या तीन मतांवर आक्षेप घेतला होता. तर मविआने भाजपाच्या दोन मतांवर आक्षेप नोंदविला होता. त्याची छाननी राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सुरू होती. त्यामुळे तब्बल ९-१० तास मतमोजणी रखडली. त्यात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यातील कांदे यांचे मत बाद ठरविण्यात आले. त्यांनी दुसऱ्या पक्षाला आपले मत दाखविल्याचा आक्षेप होता. तरीही शिवसेनेच्या संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ आणि एकूण ३९ मते पडली. त्यामुळे अपक्षांनी भाजपाला साथ दिल्याचे स्पष्ट झाले. ही नेमकी मते किती हे लवकरच स्पष्ट होईल.

भाजपाच्या पियुष गोयल तसेच अनिल बोंडे यांना प्रत्येकी ४८ मते मिळाली तर महाडिक यांना ४१ मते मिळाली. काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना ४४ मते मिळाली तर प्रफुल्ल पटेल यांना ४३ मते मिळाली.

या निकालामुळे कोल्हापूरच्या राजकारणातही भाजपाने मुसंडी मारली. चंद्रकांत पाटील यांचाही हा विजय मानला गेला. त्यांच्या वाढदिवशी त्यांना ही विजयाची भेट मिळाल्याचे मानले गेले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस साजरा केला गेला.

 

या निवडणुकीत विजयी ठरलेले उमेदवार असे

भाजपा

पियुष गोयल (४८)

अनिल बोंडे (४८)

धनंजय महाडिक (४१)

 

शिवसेना

संजय राऊत (४१)

 

राष्ट्रवादी काँग्रेस

प्रफुल्ल पटेल (४३)

 

काँग्रेस

इम्रान प्रतापगढी (४४)

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,936चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा