27 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरराजकारणफडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही ...!

फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही …!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाण्यातील ठाकरेंच्या सभेसंदर्भात काढले उद्गार

Google News Follow

Related

बुलढाणा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वीज बिलावरून उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. त्याला फडणवीस यांनी काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही, असे जोरदार प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वीज बिलावरून चांगलाच कलगीतुरारंगल्याचे दिसत आहे.

वीजबिलाच्या संदर्भात फडणवीस यांनी केलेली वक्तव्ये आणि सत्तेत आल्यानंतरची त्यांची भूमिका यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. या टिकेवर फडणवीस यांनी ट्विट करून टीकास्त्र सोडले आहे.जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही…..काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे.

हे ही वाचा:

बुलढाण्यात उद्धव ठाकरेंचे तेच ते रडगाणे!

सोन्याची तस्करी करण्यास नकार दिला म्हणून पिडीत व्यक्तीच्या मुलीला धमक्या

शिंदे गटातील आमदारांनो प्लिज नाराज व्हा ना!

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिखलीत झालेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांची मध्यप्रदेशच्या वीजबिलाची क्लीप ऐकवली. मध्यप्रदेशच्या सरकारने ६ हजार ५०० कोटी रुपये स्वतः देउन शेतकऱ्यांची वीजबिले माफ केली आहे असे फडणवीस म्हणत असल्याचे या क्लिपमध्ये आहे. त्यानंतर ठाकरे यांनी राज्यातील वीज तोडणी वरून फडणवीसांवर जोरदार टीकाही केली. राज्य सरकारने वीजबिल माफी करावी, असे आव्हानही यावेळी केले

फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही…..

जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही….. महावितरणचा हा आदेश २२ नोव्हेंबर २०२२ रोजीच जारी झालेला आहे… शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे! काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही…! २०१९ ते २०२२ या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय…असे ट्विट फडणवीस यांनी केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा