30 C
Mumbai
Wednesday, March 18, 2026
घरराजकारणएसटी कर्मचाऱ्यांप्रती राज्य सरकारला संवेदनाच नाहीत!

एसटी कर्मचाऱ्यांप्रती राज्य सरकारला संवेदनाच नाहीत!

Google News Follow

Related

देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका

राज्यात सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला गंभीर वळण येण्याच्या मार्गावर असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले राज्य सरकारचे वागणे हे अतिशय असंवेदनशील आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

आझाद मैदान येथे सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर आणि सदाभाऊ खोत यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

हे ही वाचा:

रियाझ भाटी म्हणतो, मी राष्ट्रवादीचाच

आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

३४% जागांवर भाजपाचा बिनविरोध विजय

पंजाबमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांवर सिद्धू भारी

नवाब मलिक हे आज हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते त्याबद्दल आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्याबद्दल विचारले असता त्यांनी मी केलेले ट्विट आणि आशिष शेलार यांची प्रतिक्रिया त्यासाठी पुरेशी आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

नवाब मालिकांनी केलेल्या आरोपांनांतर फडणवीस यांनी एक सूचक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आजचा सुविचार असे म्हणत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे एक वाक्य ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये फडणवीस म्हणतात की, ‘मी खूप आधीच शिकलोय की डुक्करासोबत कुस्ती खेळू नये. डुकराला ते आवडते आणि आपले कपडे खराब होतात’. फडणवीसांच्या या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा