26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरराजकारणपंजाबमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांवर सिद्धू भारी

पंजाबमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांवर सिद्धू भारी

Related

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पुढच्या वर्षीच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या आणखी एका मागणीची पूर्तता करून ऍडव्होकेट-जनरल म्हणून एपीएस देओल यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

“पंजाब मंत्रिमंडळाने ऍडव्होकेट-जनरल एपीएस देओल यांचा राजीनामा स्वीकारला आहे.” मुख्यमंत्री चन्नी यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकारांना सांगितले. हे सांगताना सिद्धू त्यांच्या बाजूलाच होते. उद्यापर्यंत ही रिक्त झालेली जागा भरण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले

मुख्यमंत्र्यांनी देओल यांना पाठिंबा दिल्याच्या काही दिवसानंतरच ही घटना घडली आहे. सोमवारी सिद्धू यांनी चन्नी यांच्यावर टीका करत देओल यांना पाठीशी घातल्याची टीका केली होती.

एपीएस देओल यांनी दोन आरोपी पोलिसांचे प्रतिनिधित्व केले होते आणि इक्बाल सहोता हे तत्कालीन अकाली दल सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीचे प्रमुख होते, ज्यावर सिद्धू यांनी न्याय सुनिश्चित करण्यात अयशस्वी झाल्याचा ठपका ठेवला होता.

सिद्धू यांनी यापूर्वी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर टीका करत त्यांना राजीनामा द्यायला लावला होता. त्यांनी चन्नी यांच्या नियुक्तीनंतरही राजीनामा दिला होता. परंतु त्यांचा राजीनामा काँग्रेस हाय कमांडने स्वीकारला नव्हता.

सिंग यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, विशेषत: सिंग यांच्याशी झालेल्या संघर्षामध्ये गांधींनी सिद्धू यांना पाठिंबा दिला होता. ज्यामुळे आजही प्रभावशाली माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. ज्यामुळे येत्या निवडणुकीत पक्षाला नक्कीच चिंता वाटेल. अतुल नंदा यांनी अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री चन्नी यांनी देओल यांना पंजाब सरकारचे सर्वोच्च वकील बनवले होते.

हे ही वाचा:

‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार

९६ देश टोचणार कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन

हायड्रोजन बॉम्ब जो फुटलाच नाही

आजचा यू-टर्न, पक्षाच्या निर्णयांच्या बाबतीत श्री सिद्धू यांच्या क्षमतेला बळकटी देतो आणि मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यातील शक्ती संतुलन काँग्रेसमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल हे अधोरेखित करते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा