33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरराजकारणहायड्रोजन बॉम्ब जो फुटलाच नाही

हायड्रोजन बॉम्ब जो फुटलाच नाही

Related

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आपण १० नोव्हेंबर रोजी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. पण हे आरोप करताना नवाब मलिक कोणताच पुरावा सादर करू शकले नाहीत. त्यामुळे हायड्रोजन बॉम्ब फुटलाच नसल्याचे म्हटले जात आहे.

मंगळवार, ९ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मालिकांचे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषींसोबत जमिनीचा व्यवहार असल्याचा बॉम्ब फोडला. यासंबंधी त्यांनी सर्व कागदपत्रे समोर ठेवली असून ही कागदपत्रे तपास यंत्रणांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर नवाब मलिक यांनी आपण हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचा दावा केला होता.

या दाव्यानुसार आज बुधवार, १० नोव्हेंबर रोजी नवाब मलिकांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस इतरांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करतात, पण ते स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या लोकांना सरकारी कमिशन आणि बोर्डाचे अध्यक्षपद का दिले? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार

९६ देश टोचणार कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन

न्यूझीलंड सोबतच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुन्ना यादव हा नागपूरचा गुंड आहे. पण तो आपल्या राजकीय साथीदार आहे. त्याला फडणविसांनी कन्स्ट्रक्शन बोर्डाचा अध्यक्ष बनवलं होतं की नाही? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. तुमच्याकडे गंगेत मुन्ना यादव पवित्र झाला होता की नव्हता? असेही नवाब मलिक यांनी विचारले आहे. तर त्यासोबतच त्यांनी हैदर आझम नावाच्या एका व्यक्तीला मौलाना आझाद वित्तीय महामंडळाचा अध्यक्ष केलं होतं की नव्हतं? असा सवाल विचारला आहे. हैदर हा बांगलादेशी नागरिकांना मुंबईत आणून वसवण्याचा प्रयत्न करतो की नाही? असेही मलिक यांनी म्हटले आहे. हैदर आझमची दुसरी पत्नी बांगलादेशी असून त्याची चौकशी बंगाल पोलिसांनी सुरू केली. बंगाल पोलिसांकडे हैदर आझमचा जन्म दाखला आणि इतर कागदपत्रे खोटी असल्याची माहिती होती. यावेळी मालाड येथील पोलिस स्थानकात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असतानाच मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

तर दाऊदचा निकटवर्तीय असलेला रियाज भाटी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात पोहोचला? असा सवालही मलिक यांनी विचारला आहे. रियाज भाटी हा दोन पासपोर्ट सोबत पकडला गेला होता आणि दोन दिवसात कसा सुटला? तो तुमच्या कार्यक्रमात कसा काय दिसतो. फडणवीस आणि भाटी यांचा संबंध काय? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

नोटबंदीच्या काळात महाराष्ट्रात बनावट नोटांचा कारभार फडणवीस सरकारच्या सुरक्षेत चालत होता असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली तेव्हा पंजाब, मध्य प्रदेश सारख्या राज्यांतून खोट्या नोटा पकडल्या जात होत्या. पण ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रातून खोट्या नोटांचे एकही प्रकरण उघडकीस आले नाही. या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणामुळे महाराष्ट्रात बनावट नोटांचा हा कारभार सुरू होता असा आरोप मलिक यांनी केला आहे.

८ ऑक्टोबर २०१७ रोजी बीकेसी मध्ये डायरेक्टर इंटेलिजन्स रेवेन्यूने छापेमारी करत १४ कोटी ५६ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. पण ते प्रकरण रफादफा करण्यासाठी फडणवीस यांनी मदत केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांच्या या आरोपानंतर हा बॉम्ब टाकण्याचा खेळ अजून कुठवर जाणार याकडे महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरा आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा