27 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरक्राईमनामानवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार

Related

आल्या दिवशी आरोपाच्या फैरी झडत चर्चेत राहणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रांती रेडकर यांच्या बहिणीने नवाब मलिक यांच्या विरोधात पोलिसात धाव घेतली असून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर यांची बहीण हर्षदा रेडकर यांच्यावर गंभीर आरोप करताना त्यांच्यावर ड्रग्स प्रकरणात खटला सुरू आहे असे ट्विट केले होते. यावरूनच हर्षदा रेडकर यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

नवाब मलिक यांनी ८ नोव्हेंबर रोजी ट्विट करताना समीर वानखेडे यांची मेहुणी, क्रांती रेडकर यांची बहीण हर्षदा दिनानाथ रेडकर या ड्रग्स व्यवसायात सहभागी आहेत का? असा सवाल विचारला होता. तर त्यांचा खटला पुणे न्यायालयात प्रलंबित असल्याचेही नवाब मलिक यांनी म्हटले होते.

हे ही वाचा:

संप केलात ना! ३७६ एसटी कर्मचाऱ्यांचे केले निलंबन

ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले

हिंदू संस्थांना बदनाम करायचा नवाब मलिकांचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांना मणक्याचा त्रास; शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

या आलोपांवरूनच हर्षदा रेडकर या आक्रमक झाल्या असून त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग अवलंबला आहे. मंगळवार, ९ नोव्हेंबर रोजी नवाब मलिक यांच्याविरोधात हर्षदा यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात कलम ३५४, ३५४ ड, ५०३ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात यावा अशी मागणी हर्षदा रेडकर यांनी केली आहे. हर्षदा यांच्या तक्रारीनुसार जर नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला तर त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत.

दरम्यान कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर मोठा बॉम्ब फोडला आहे. मलिक यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषींसोबत जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा खळबळजनक आरोप फडणवीस यांनी केला आहे. तर या संबंधित सर्व पुरावे आपण योग्य त्या तपास संस्थांना देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा