33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरविशेषसंप केलात ना! ३७६ एसटी कर्मचाऱ्यांचे केले निलंबन

संप केलात ना! ३७६ एसटी कर्मचाऱ्यांचे केले निलंबन

Related

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, एसटीकडून दिली जाणारी दुय्यम वागणूक, तोट्यात चाललेले महामंडळ या सगळ्या पार्श्वभूमीवर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली पण या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले. राज्यभरातून एकूण ३७६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

या कर्मचाऱ्यांनी केलेले काम बंद आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्याचा फटका एसटी वाहतुकीला बसला आहे. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याही रास्त आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने संपात सहभागी झालेल्या राज्यभरातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यभरातील १६ विभागातील ४५ आगारांमधील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर ही निलंबनाची कारवाई केली गेली आहे. यामध्ये नाशिक विभागातील कळवण आगारातील १७ कर्मचारी, वर्धा विभागातील वर्धा आणि हिंगणघाट आगारामधील ४० कर्मचारी, गडचिरोली विभागातील अहेरी, ब्रह्मपुरी, गडचिरोली आगारातील १४ कर्मचारी, चंद्रपूर विभागातील चंद्रपूर, राजुरा, विकाशा आगारातील १४ कर्मचारी , लातुर विभागातील औसा, उदगीर, निलंगा, अहमपुर, लातुर आगारातील ३१ कर्मचारी, नांदेड विभागामधील किनवट, भोकर, माहुर, कंधार, नांदेड, हादगाव, मुखेड, बिलोली, देगलुर आगारातील ५८ कर्मचारी, भंडारा विभागामधील तुमसर, तिरोडी, गोंदिया आगारामधील ३० कर्मचारी, सोलापुर विभागातील अक्कलकोट आगारामधील २ कर्मचारी, यवतमाळ विभागातील पांढरकवडा, राळेगाव, यवतमाळ आगारातील ५७ कर्मचारी, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद-१ आगारातील पाच कर्मचारी, परभणी विभागातील हिंगाली व गंगाखेड आगारातील १० कर्मचारी, जालना विभागातील जाफ्राबाद व अंबड आगारातील १६ कर्मचारी, नागपूर विभागामधील गणेपेठ, घाटरोड, इमामवाडा, वर्धमान नगर आगारातील १८ कर्मचारी, जळगाव विभागातील अंमळनेर आगारातील चार कर्मचारी, धुळे विभागातील धुळे आगारातील दोन कर्मचारी, सांगली विभागातील जत, पलुस, इस्लामपुर,आटपाडी आगारातील ५८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

हे ही वाचा:

वरळी कोळीवाड्यात दोन बसमध्ये चिरडून तरुणीचा मृत्यू

ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले

हिंदू संस्थांना बदनाम करायचा नवाब मलिकांचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांना मणक्याचा त्रास; शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या विरोधात न्यायालायने आदेश दिला होता आणि हा संप बेकायदेशीर ठरवला होता. त्यानंतर देखील काही संघटनांनी, एसटीच्या संपाची नोटीस दिली होती आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो. उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर आहे, असं जाहीर केलेलं आहे. हे जाहीर केल्याच्या नंतर देखील, हा संप सुरू असल्याचं काल आम्ही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, उच्च न्यायालयाने सूचना केली की याबाबत तुम्ही अवमान याचिका दाखल करू शकतात. म्हणून एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा