25 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरराजकारणफडणवीसांनी ठोकले!

फडणवीसांनी ठोकले!

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगाव येथील सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत फडणवीसांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या बीकेसी येथील सभेला फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे यांच्या बीकेसी येथील सभेनंतर फडणवीसांनी आधीच सांगितले होते की ‘जवाब मिलेगा, ठोक के मिलेगा’ त्यानुसार देवेंद्र फडणीस यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना ठोकून काढले आहेत

गोरेगाव येथील नेस्को मैदानात भाजपाकडून हिंदी भाषिक संमेलन आयोजित करण्यात आले होते. हजारोच्या संख्येने मुंबईतील हिंदी भाषिक नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे गदा भगवान हनुमानाची मूर्ती, प्रभू श्री रामाची मूर्ती, बिहार मधील प्रसिद्ध मिथिला पेंटिंग अशा गोष्टी देऊन स्वागत करण्यात आले. तर सामूहिक हनुमान चालीसा पठण करत या सभेची सुरुवात भाजपकडून करण्यात आले.

फडणवीसांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच बिहारीमध्ये उपस्थितांशी संवाद साधला. ज्याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांनतर त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेला मास्टर सभा म्हटले होते. पण ही सभा पाहिल्यावर आमच्या लक्षात आले की ही लाफ़्टर सभा होती असे फडणवीस म्हणाले. काल भगवान नृसिंह आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती. आम्हाला वाटलेलं त्यांच्या शिकवणीबद्दल काहीतरी बोलतील. पण अखेरपर्यंत लाफ़्टर शो संपलाच नाही. काल आमचे एक मित्र म्हणाले की शंभर सभांची बाप सभा आहे. बरोबर आहे त्यांचे शंभर हे कौरवांसोबत होते. काल कौरवांची सभा झाली आज पांडवांची सभा आहे असे म्हणत फडणवीसांनी सणसणीत टोला लगावला.

हे ही वाचा:

तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही

‘तुम्ही वैयक्तिक टीका करता, आम्ही म्याव म्याव केलं तर चालत नाही?’

 

न्यूयॉर्कमध्यल्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार; १० जण ठार

‘शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का?’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील पहिले मुख्यमंत्री असतील जे अडीच वर्षात राज्याच्या विकासावर बोललेच नाहीत असे म्हणत फडणवीसांनी राज्यातील सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढाचा वाचला. या राज्यात कोविड काळात भ्रष्टाचार झाला, लोक मेले, पालघरला साधूंची हत्या झाली, मनसुख हिरेनची हत्या झाली, बावसुलीसाठी गृहमंत्री जेलमध्ये गेले, दाऊदशी व्यवहार केल्याच्या आरोपांवरून अटकेत असलेले मंत्री अजूनही मंत्रिमंडळात आहेत, यशवंत जाधवच्या मालमत्ता वाढल्या, मातोश्रीला त्यांनी ५० लाखांचे घडयाळ दिले असे म्हणत फडणवीसांनी सरकारवर तोफ डागली आहे.

या राज्यात कोणी विचार केला असेल की हिंदुहृदयसम्राटांचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा म्हणणे राजद्रोह ठरेल, आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणे राजशिष्टाचार ठरेल. या सरकारला लाज वाटत नाही का? तो ओवैसी येऊन गेला आणि हे सरकार बघत बसले. चुल्लू भर पानी मे डूब मारो. अरे ओवैसी कुत्ताभी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर, अब तो भगवा लहराएगा पुरे हिंदुस्थान पर असा जोरदार हल्ला फडणवीस यांनी चढवला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा