26 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरराजकारण‘शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का?’

‘शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का?’

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, १४ मे रोजी मुंबईत सभा घेऊन विरोधकांवर टीका केली होती. त्यावर अमरावतीचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सणसणीत टीका केली आहे.

शनिवारची सभा ही लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा होती, असा सणसणीत टोला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. राज्यातले त्यांचेच मंत्री लोड शेडींग आणि शेतकरी यांच्या समस्येबद्दल सांगत असतात मात्र, कालच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका शब्दाने शेतकरी किंवा लोड शेडींगबद्दल बोलले नाहीत. त्यांनी राज्यातल्या बेरोजगारी समस्येवर बोलणं अपेक्षित होतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात तीन पटींनी बेरोजगारी वाढली आहे. त्याबद्दल काहीही ते सभेत बोलले नाही. केवळ विरोधकांवर टीका करण्यासाठी म्हणून त्यांनी सभा घेतली होती, अशी टीका नवनीत राणा यांनी केली. विदर्भात दौरा केला असं म्हणतात. एखादा दौरा केला असेल पण कोणकोणत्या गावात गेलात कोणत्या शेतकऱ्यांना भेटलात त्याचे व्हिडीओ दाखवा ना, असे नवनीत राणा म्हणाल्या.

काल संभाजी महाराजांची जयंती होती. मात्र, मंचावर भर सभेत उद्धव ठाकरे म्हणतात की, औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर ठेवायची काय गरज. तुमच्याच अजेंडावर हे होतं, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० लोकांना न्याय दिला. उद्धव ठाकरेंना माहित आहे की, त्यांनी औरंगाबादचं नाव बदललं की इतर पक्ष वेगळे होऊन आपल्या मार्गाने निघून जातील आणि हीच भीती आहे त्यांना, असा खोचक टोला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

हनुमान चालीसा वाचायची तर काश्मीरमध्ये वाचा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तेव्हा त्यांनी हेच दाखवून दिलं की महाराष्ट्रात हनुमान चालीसा पठणासाठी यांचा विरोध आहे. हनुमान चालीसा पठण करणार म्हणून आमच्यावर राजद्रोह लावतात, पण औरंगजेबाच्या थडग्यावर फुलं वाहणाऱ्यावर एक शब्द बोलले नाहीत, अशी सणसणीत टीका नवनीत राणा यांनी केली आहे. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला फुलं वाहणाऱ्याला त्याच कबरीत गाडलं असतं. शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का? असा खोचक सवाल नवनीत राणा यांनी विचारला आहे.

सभा मुंबई पालिकेसाठी होती सांगतात आणि सभेसाठी लोकांना महाराष्ट्रातून बोलावलं होतं. तरीही त्या सभेत कसलाही उत्साह नव्हता, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. उद्धव ठाकरे हे निवडणूक लढायला घाबरतात, असेही नवनीत राणा म्हणाल्या.

हे ही वाचा:

हर्णे : मन जिंकणारे बंदर

अष्टपैलू माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघाती निधन

अरे छट् हा तर निघाला… आणखी एक टोमणे बॉम्ब

केतकी चितळेवर शाई आणि अंडीफेक

राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती त्यावरूनही नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. स्वप्न बघून ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद राज ठाकरे ठेवतात. राज ठाकरे जर सुपरहिट झाले तर तुम्ही आधीच फ्लॉप आहात त्यात अजून फ्लॉप व्हाल, असा खोचक टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे.

आमदार रवी राणा यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवभोजन थाळी म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे. शिवसेनेच्या गुंडांवर गुन्हे दाखल होत नाहीत पण आम्ही घराच्या बाहेरही पडलो नाही तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. तुमचा हा दुटप्पीपणा महाराष्ट्र बघतोय, अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा