30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामाकेतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी

केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी

Google News Follow

Related

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर टीका केल्यानंतर ठाणे पोलिसांनी केतकी हिला अटक केली होती. त्यानंतर केतकीला आज, १५ मे रोजी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयाने केतकी चितळे हिला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनवली आहे.

शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे केतकी हिच्या अडचणीत वाढ झाल्या असून न्यायालयात आज केतकी हिने स्वतःच न्यायालयात युक्तिवाद केला. त्यानंतर १८ मे पर्यंत केतकीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वकील नितीन भावे यांनी शरद पवार यांच्यावर लिहिलेल्या वादग्रस्त कवितेतील ओळी केतकी चितळेने आपल्या सोशल मीडियावरून शेअर केल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्यात केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ठाणे पोलिसांनी शनिवार, १४ मे रोजी सायंकाळी केतकीला अटक केली.

केतकीला अटक करताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आधीच ठाणे पोलिस ठाण्यासमोर जमले होते. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी कळंबोली पोलिस ठाण्याबाहेर केतकीवर अंडी आणि शाईफेक केली. तसेच तिच्याविरोधात घोषणाबाजी केली.

हे ही वाचा:

‘शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का?’

हर्णे : मन जिंकणारे बंदर

अष्टपैलू माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघाती निधन

अरे छट् हा तर निघाला… आणखी एक टोमणे बॉम्ब

केतकीने केलेल्या विधानांचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून आतापर्यंत तिच्यावर १० पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी कळवा, धुळे, पुणे, सिंधुदुर्ग, पिंपरी-चिंचवड, अकोला, मुंबईतील गोरगाव इथे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आज मुंबईतील पवई पोलिस ठाणे, नाशिक सायबर पोलिस ठाणे आणि अमरावतीत गाडगे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा