33 C
Mumbai
Monday, April 27, 2026
घरक्राईमनामाजेवणानंतर कलिंगड खाल्ल्यावर एकाच कुटुंबातील चार जणांनी गमावला जीव !

जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यावर एकाच कुटुंबातील चार जणांनी गमावला जीव !

शवविच्छेदन अहवालातच कारण येईल लक्षात

Google News Follow

Related

दक्षिण मुंबईतील पायधुनी येथे कथित अन्न विषबाधेची धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका मुस्लिम कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये ४० वर्षीय पती, ३५ वर्षीय पत्नी आणि त्यांच्या १६ व १३ वर्षांच्या दोन मुलींचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास या कुटुंबाने नातेवाईकांसह एकत्र जेवण केले होते. एकूण नऊ जणांनी जेवण घेतले होते. जेवणानंतर नातेवाईक आपल्या घरी परतले. त्यानंतर मध्यरात्री १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान या चारही जणांनी कलिंगड खाल्ले होते.

हे ही वाचा:

मरीन ड्राईव्ह परिसरात दुचाकींची धडक; तिघांचा मृत्यू

आत्मनिर्भर भारताला बुस्ट! बुलेट ट्रेनचे कोच देशातच होणार विकसित

लष्कर-ए-तैयबाचा कमांडर शेख युसुफ अफरीदीची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या

मारुती सुजुकीचा विक्रम: एका वर्षात २३.४ लाख गाड्यांचे उत्पादन

सदर कुटुंबातील ९ जणांनी बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतर या चार जणांनी रात्री त्यावर कलिंगड खाल्ले. त्याचा त्यांना त्रास झाला असावा असा अंदाज आहे. बिर्याणी खाणारे बाकी लोकांना मात्र कोणताही त्रास झालेला नाही.

रात्री कलिंगड खाल्ल्यावर पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास चौघांनाही उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने कौटुंबिक डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जेजे रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान सकाळी १०.१५ वाजता धाकट्या मुलीचा मृत्यू झाला, तर रात्री १०.३० वाजता कुटुंब प्रमुखाने अखेरचा श्वास घेतला. यापूर्वीच पत्नी आणि मोठ्या मुलीचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणी शवविच्छेदन करण्यात आले असून नेमके मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजी अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या घटनेची नोंद जेजे मार्ग पोलीस ठाणे येथे अपघाती मृत्यू (AD) म्हणून करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा