32 C
Mumbai
Wednesday, April 29, 2026
घरविशेषमरीन ड्राईव्ह परिसरात दुचाकींची धडक; तिघांचा मृत्यू

मरीन ड्राईव्ह परिसरात दुचाकींची धडक; तिघांचा मृत्यू

मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकासह तरुण आणि तरुणी यांचा समावेश

Google News Follow

Related

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. तीन दुचाकींची एकमेकांना धडक बसली आणि या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकासह एक तरुण आणि तरुणी यांचा समावेश आहे.

सोमवारी मरीन ड्राईव्ह परिसरात पहाटे ५.४५ च्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात एक स्पोर्ट्स बाईक आणि दोन स्कूटी यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की या तिन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांमध्ये एका ६०-६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह, एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. या तिन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत. हा अपघात ओव्हरस्पीडमुळे झाला की अन्य काही तांत्रिक कारणांमुळे, याचा तपास सध्या सुरू आहे.

हे ही वाचा:

शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; सन फार्मामध्ये तेजी, पेटीएममध्ये घसरण

लष्कर-ए-तैयबाचा कमांडर शेख युसुफ अफरीदीची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या

पहिले होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, अणुचर्चा नंतर!

अमेरिकेच्या हिताकडे झुकलेला पाकिस्तान योग्य मध्यस्थ नाही!

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळाचे पंचनामे केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना संपर्क साधला असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा